Bomb Threat in Pune: पुण्यातील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बची धमकी; पोलिसांची तत्काळ कारवाई

कोरेगाव पार्क परिसरातील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली.

Bomb Threat in Pune: पुण्यातील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बची धमकी; पोलिसांची तत्काळ कारवाई

Bomb Threat in Pune: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतत सजग राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच कोरेगाव पार्क परिसरातील एका सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने शुक्रवारी दुपारी मोठी खळबळ उडाली. हॉटेलच्या लँडलाईनवर आलेल्या एका संशयास्पद फोनकॉलने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. दुपारी साधारण 12.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या अधिकृत लँडलाइनवर एक कॉल आला. मोबाईल नंबरवरून संपर्क साधणाऱ्या एका व्यक्तीने, “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लगेच हॉटेल रिकामे करा,” अशी थेट धमकी दिली. अनपेक्षितपणे मिळालेल्या या धक्कादायक मेसेजनंतर हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून काही मिनिटांतच कोरेगाव पार्क पोलीस, तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलचा प्रत्येक कोपरा तपासण्यात आला, सुरक्षा पथकांनी सखोल पाहणी करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. काही वेळ चाललेल्या या तपासणीनंतर, संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने ‘क्लिअर’ घोषित करण्यात आला आणि धमकीचा फोन पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Crime News: चोरांनी चोरीची हद्दच पार केली! रुगलाण्यात मृताच्या अंगावरचे दागिने लंपास केले

कर्मचारी आणि ग्राहकांचा सुटकेचा निश्वास

तपासणीदरम्यान हॉटेलमधील कर्मचारी तसेच ग्राहकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सर्वांनीच दिलासा घेतला. पोलिसांच्या तत्पर प्रतिसादामुळे कोणताही अनर्थ घडला नाही.

हेही वाचा – California Shooting Incident: अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 14 जखमी, हल्लेखोर फरार

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा खोडसाळ प्रकार कोणत्या उद्देशाने करण्यात आला याचा तपास सुरू आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, ही घटना सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हाने अधोरेखित करणारी ठरली. पोलिसांनी नेमकेपणा आणि तत्परतेने काम करत परिस्थिती शांत केली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number