BMC News: मुंबई पालिकेत पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय; ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 800 अभियंत्यांच्या बदल्या

महापालिकेतील काही संवेदनशील आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून अभियंते एकाच जागी ठाम ठाण मांडून बसल्याचे समोर आल्यानंतर ही मोठी प्रशासकीय फेरबदलाची कारवाई हाती घेण्यात आली आहे.

BMC News: मुंबई पालिकेत पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय; ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 800 अभियंत्यांच्या बदल्या

BMC Engineers Transfer:  मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागात प्रशासकीय पारदर्शकता आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक अत्यंत मोठा पाऊल उचलले आहे. दीर्घकाळ एकाच पदावर किंवा विभागात कार्यरत असलेल्या सुमारे 800 कनिष्ठ, उप आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या आता संगणकीकृत ‘Employee Transfer System Based on Randomization’ ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्या जात आहेत. महापालिकेतील काही संवेदनशील आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून अभियंते एकाच जागी ठाम ठाण मांडून बसल्याचे समोर आल्यानंतर ही मोठी प्रशासकीय फेरबदलाची कारवाई हाती घेण्यात आली आहे.

राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब
यापूर्वी महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले होते. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2026 मध्ये करण्यात आलेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर मानवी हस्तक्षेप पूर्णपणे रोखण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन रँडमायझेशन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

हेही वाचा – Nashik News : प्रवाशांनो, ही बातमी महत्त्वाची! नाशिकरोड बसस्थानक 3 महिने बंद; बससेवा कुठून आणि कोणत्या मार्गाने?

बदली प्रक्रियेचे वेळापत्रक आणि महत्त्वाचे टप्पे
बदल्यांची ही नवीन ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाने ठरवलेले नियोजन आहे. अभियंत्यांकडून ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 5 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2026 हा कालावधी देण्यात आला होता. 18 सप्टेंबरपर्यंत प्रशासनाकडे एकूण 494 अर्जांची नोंद झाली होती. अर्जांची संपूर्ण छाननी पूर्ण झाल्यानंतर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले जातील.

विभागीय कार्यपद्धतीत मोठ्या फेरबदलाची शक्यता
रँडमायझेशन प्रणालीमुळे वैयक्तिक हस्तक्षेपाला पूर्णपणे आळा बसणार असल्याने कोणत्या अभियंत्याची कुठे वर्णी लागणार याकडे पालिका वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी असलेल्या अभियंत्यांच्या या मोठ्या संख्येने होणाऱ्या बदल्यांमुळे पालिकेच्या विविध अभियांत्रिकी विभागांमधील कामाच्या पद्धतीत आणि प्रशासकीय रचनेत व्यापक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – Mumbai Water Supply Project: मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' भूमिगत जलबोगद्याला मंजुरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number