SBI Cashback Card Alert: SBI क्रेडिट कार्डधारकांना झटका; 1 एप्रिलपासून कॅशबॅकच्या नियमांत मोठे बदल

नवीन बदलांनुसार, कार्डधारकांना मिळणाऱ्या कॅशबॅकची कमाल मर्यादा कमी करण्यात आली असून, याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर होणार आहे.<br/>

SBI Cashback Card Alert: SBI क्रेडिट कार्डधारकांना झटका; 1 एप्रिलपासून कॅशबॅकच्या नियमांत मोठे बदल

SBI Cashback Card Alert: जर तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी 'Cashback SBI Card' वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. SBI Card ने आपल्या लोकप्रिय 'Cashback SBI Card' वर मिळणाऱ्या लाभांमध्ये (Benefits) कपातीची घोषणा केली आहे. हे सुधारित नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. नवीन बदलांनुसार, कार्डधारकांना मिळणाऱ्या कॅशबॅकची कमाल मर्यादा कमी करण्यात आली असून, याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर होणार आहे.

कॅशबॅकच्या मर्यादेत 20 टक्के कपात; आता मिळणार कमी फायदा
द इकॉनॉमिक टाइम्समधील अहवालानुसार, सध्या एका स्टेटमेंट सायकलमध्ये जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवता येत होता. मात्र, नवीन नियमांनुसार ही मर्यादा 5,000 रुपयांवरून कमी करून 4,000 रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ग्राहकांना आता पूर्वीच्या तुलनेत 20 टक्के कमी कॅशबॅक मिळेल. एकदा का तुम्ही 4,000 रुपयांची ही मर्यादा ओलांडली, की त्या महिन्यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त कॅशबॅक दिला जाणार नाही.

कॅशबॅकमध्ये कपात
कॅशबॅकचे दर जरी तेच राहिले असले, तरी एकूण रकमेवर आता मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळणे सुरूच राहील, परंतु त्याची कमाल मर्यादा आता 2,000 रुपये असेल. त्याचप्रमाणे, ऑफलाइन खर्चावर (POS टर्मिनल्सद्वारे) मिळणाऱ्या 1 टक्का कॅशबॅकची मर्यादा देखील 2,000 रुपये इतकीच असेल. थोडक्यात, कोणत्याही परिस्थितीत एका महिन्यात मिळणारा एकूण कॅशबॅक 4,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.

हेही वाचा – LPG ATM : आता गॅस सिलिंडर मिळणार 'एटीएम' मधून! देशात कुठे सुरू झालीय ही सुविधा?

रिवॉर्ड पॉइंट्स आणि पूर्ततेचे नवीन नियम
रिवॉर्ड पॉइंट्सच्या वापराबाबतही बँकेने कडक नियम लागू केले आहेत. आता रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता (Redeem) केवळ 4,000 च्या पटीतच करता येईल. तसेच, एका महिन्यात जास्तीत जास्त 60,000 रिवॉर्ड पॉइंट्सच रिडीम करता येतील. हे नियम 'PhonePe SBI Card PURPLE' आणि 'PhonePe SBI Card SELECT BLACK' या कार्ड्सना देखील लागू होणार आहेत. हे रिवॉर्ड्स रिडीम करण्यासाठी ग्राहक 'SBI Card' ॲपमधील 'Rewards' विभागात जाऊन आपले पसंतीचे व्हाउचर निवडू शकतात.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number