Wardha Crime: वर्ध्यात वरातीत रक्ताचा सडा! चाकूने भोसकून पुतण्याने केला काका अन् चुलत भावाचा गेम; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

महिला आश्रम परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या या थरारामुळे लग्नाच्या मंगल वातावरणाचे रूपांतर क्षणात स्मशानशांततेत झाले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.<br/>

Wardha Crime: वर्ध्यात वरातीत रक्ताचा सडा! चाकूने भोसकून पुतण्याने केला काका अन् चुलत भावाचा गेम; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

Wardha Crime: वर्धा शहरात एका लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरझण पडणारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्या हातांनी लग्नात अक्षता टाकायच्या होत्या, त्याच हातांनी रक्ताचा सडा टाकला. जुन्या वैमनस्यातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच काका आणि चुलत भावाला संपवलं. महिला आश्रम परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या या थरारामुळे लग्नाच्या मंगल वातावरणाचे रूपांतर क्षणात स्मशानशांततेत झाले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भरवस्तीत बाप-लेकावर चाकूने सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, बरबडी येथील भलमे कुटुंबातील एका विवाहाची वरात हनुमान मंदिराजवळ ढोल-ताशांच्या गजरात निघाली होती. नातेवाईक नाचण्यात दंग असताना, गर्दीचा फायदा घेऊन आरोपी मुलाने प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे यांच्यावर चाकूने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि वेगवान होता की, बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

8 महिन्यांचा सूड आणि ‘ऑनलाइन’ शस्त्राचा वापर
हे हत्याकांड अचानक घडलेले नसून, आरोपीने याचा कट अत्यंत थंड डोक्याने रचला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भलमे कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या एका मोठ्या भांडणातून आरोपीने मनात सूडाची भावना धरली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हा गुन्हा करण्यासाठी आरोपीने काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग साईटवरून चाकू मागवला होता. गर्दीच्या ठिकाणी ओळख पटणार नाही आणि गोंधळात काम फत्ते होईल, या हेतूनेच त्याने वरातीची वेळ निवडली होती.

हेही वाचा – Ashok Kharat Case: ‘बाहेर पडणं कठीण झालंय…’; खरात प्रकरणातील पीडित महिलांची मानसोपचार तज्ज्ञांकडे आर्त हाक, समाजात वावरण्याची वाटतेय भीती

पोलीस कारवाई आणि तणावाचे वातावरण
शेकडो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने वर्ध्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वर्धा शहर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणात ऑनलाइन शस्त्र मागवण्याच्या प्रक्रियेची आणि या कटात कुटुंबातील किंवा बाहेरील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करत आहेत.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number