Leopard Bittu Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बिट्टू’ बिबट्याचा मृत्यू; सरनाईक कुटुंबावर शोककळा

बिट्टूला 2019 मध्ये ठाण्यातील येऊर परिसरातून रेस्क्यू करून उद्यानात आणले होते. तेव्हापासून तो पर्यटकांच्या आणि प्राणीप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता.

Leopard Bittu Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बिट्टू’ बिबट्याचा मृत्यू; सरनाईक कुटुंबावर शोककळा

Leopard Dead In Sanjay Gandhi National Park: मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (SGNP) एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराशी लढा देणारा 6 वर्षांचा ‘बिट्टू’ नावाचा नर बिबट्या अखेर मृत्यूशी हरला. 21 मार्च 2026 रोजी या लाडक्या बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. बिट्टूला 2019 मध्ये ठाण्यातील येऊर परिसरातून रेस्क्यू करून उद्यानात आणले होते. तेव्हापासून तो पर्यटकांच्या आणि प्राणीप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. मात्र, किडनीशी संबंधित गंभीर आजाराने त्याचा बळी घेतला.

गंभीर आजार आणि वैद्यकीय प्रयत्न
गेल्या काही महिन्यांपासून बिट्टूच्या वागण्यात आणि प्रकृतीत बदल जाणवू लागले होते. वन विभागाच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला ‘पॉलीसिस्टिक किडनी डिसीज’ हा दुर्मिळ आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर सातत्याने उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती खालावत गेली. शवविच्छेदनानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे बिट्टूचे इतर अवयवही काम करेनासे झाले होते. अधिक सखोल तपासासाठी त्याचे नमुने परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.

सरनाईक कुटुंबाचा ‘दत्तक मुलगा’ हरपला
बिट्टूचा मृत्यू केवळ एका प्राण्याचा मृत्यू नव्हता, तर एका कुटुंबाने आपला सदस्य गमावल्याची ती भावना आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी बिट्टूला दत्तक घेतले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी बिट्टूचे एक वेगळे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. बिट्टूच्या निधनाने सरनाईक कुटुंबीय भावूक झाले असून, त्याला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. सरनाईक यांनी वेळोवेळी बिट्टूच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली होती.

हेही वाचा – Shabbir Ansari Passes Away: OBC चळवळीचा बुलंद आवाज हरपला; दिग्गज नेते शब्बीर अन्सारी यांचे जालन्यात निधन

‘बिट्टू बॉस’च्या आठवणींना उजाळा
प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत बिट्टूला श्रद्धांजली वाहिली आहे. “आज आमचा लाडका ‘बिट्टू बॉस’ आम्हाला सोडून गेला. तो केवळ एक प्राणी नव्हता, तर आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बिट्टूची निरागसता आणि त्याचे अस्तित्व कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. सोशल मीडियावरही अनेक प्राणीप्रेमींनी बिट्टूच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number