India Leads Digital Finance : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञान बाजारपेठांमध्ये अग्रक्रमावर पोहोचला आहे. तब्बल 210 दशलक्ष भारतीय क्रिप्टो वापरकर्त्यांसह, भारताने अमेरिका, युरोप यांच्यापेक्षा मोठा डिजिटल-अॅसेट समुदाय उभा केला आहे. भारतीय वापरकर्ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने ते गुंतवणुकीचे नवे मार्ग आजमावण्यास उत्सुक असतात. मात्र प्लॅटफॉर्मची सुरक्षितता आणि पारदर्शकता हा त्यांचा सर्वात मोठा निकष ठरू लागला आहे.
प्लॅटफॉर्म सुरक्षा, ‘नवीन गुंतवणूकदारांचा’ सर्वात मोठा प्रश्न
सुरुवातीला काही प्लॅटफॉर्म कमी पडताळणी आणि साध्या प्रक्रियांमुळे वापरकर्त्यांना आकर्षित करतात. पण अशा प्लॅटफॉर्मवर संशयास्पद व्यवहार, हॅकिंग यांसारख्या घटना उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास ढासळतो. याच पार्श्वभूमीवर Binance सारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सनी सुरक्षा सर्वात वरच्या क्रमांकावर ठेवली आहे.
हेही वाचा – Sim Card Misuse: 50 लाख रुपयांपर्यंत दंड अन् तुरुंगवास…! सिम कार्डच्या गैरवापराबाबत सरकारने जारी केला इशारा
सुरक्षितता आमची पहिली अट
दरम्यान, Binance चे APAC प्रमुख एस. बी. सेकर यांनी सांगितले की, FIU-IND मध्ये आमची नोंदणी ही नियमांचे कठोर पालन करण्याची हमी आहे. आम्ही बायोमेट्रिक पडताळणी, मल्टी-फॅक्टर लॉगिन आणि 24×7 रिअल-टाइम मॉनिटरिंगद्वारे वापरकर्त्यांचे संरक्षण करतो. वापरकर्त्यांचा विश्वास वाढावा म्हणून Binance ने अनेक नवे सुरक्षा उपाय सुरू केले आहेत. यातील काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.
Proof of Reserves (PoR) – 100 टक्के मालमत्ता सुरक्षित असल्याची क्रिप्टोग्राफिक पडताळणी. या प्रणालीत वापरकर्त्यांची गोपनीयता कायम राखून प्लॅटफॉर्मवर असलेली मालमत्ता 100 टक्के सुरक्षित आहे, याची खात्री दिली जाते.
SAFU – 1 अब्ज डॉलर पेक्षा अधिक मालमत्तेचा सुरक्षा फंड
2018 पासून सुरू असलेला हा फंड गरज पडल्यास वापरकर्त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जातो. हा फंड पूर्णपणे पारदर्शक आहे.
जागतिक पातळीवरील क्रिप्टो सुरक्षा
तथापी, Chainalysis आणि TRM Labs च्या नव्या अहवालानुसार केंद्रीकृत एक्सचेंजेसवरील अवैध व्यवहारांचे प्रमाण 2023 ते 2025 दरम्यान इतिहासातील सर्वात कमी पातळीवर आले आहे. 2023 ते 2025 दरम्यान Binance ने गुन्हेगारी व्यवहारांत 96–98 टक्के घट केली, जी इतर मोठ्या एक्सचेंजेसपेक्षा जास्त वेगाने झाली.
हेही वाचा – Google AI Gemini: शॉपिंग सीझनला नवा AI साथीदार; Google ने दाखवले ‘स्मार्ट खरेदी’चे चार नवे मार्ग
तपास यंत्रणांशी Binance चे सहकार्य वाढले
जगभरातील तपास संस्थांकडून आलेल्या 2.4 लाखांहून अधिक विनंत्या Binance ने हाताळल्या. तसेच 400+ प्रशिक्षण सत्रे देऊन पोलिसांना ब्लॉकचेन तपासात मदत केली. भारतातील एजन्सीसोबत सायबर फसवणुकींचा मागोवा घेण्यासाठी Binance ने सक्रिय सहकार्य दाखवेल. Binance कडे SOC 2 Type II, ISO 27001, ISO 27701, PCI-DSS सारखी महत्त्वाची सुरक्षा प्रमाणपत्रे आहेत. ज्यामुळे ते सुरक्षा-आधारित, धोका आधी ओळखणारे एक्सचेंज बनले आहे.