ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ; ‘या’ भारतीय खेळाडूची टॉप-10 मध्ये झेप

दीर्घकाळापासून फलंदाजांच्या यादीत नंबर वनचे स्थान पटकावून बसलेल्या इंग्लंडच्या जो रूटला मोठा धक्का बसला आहे. सुमार कामगिरीमुळे त्याचे अव्वल स्थान हिरावले गेले असून तो थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ; ‘या’ भारतीय खेळाडूची टॉप-10 मध्ये झेप

ICC Test Rankings: आयसीसी (ICC) ने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. दीर्घकाळापासून फलंदाजांच्या यादीत नंबर वनचे स्थान पटकावून बसलेल्या इंग्लंडच्या जो रूटला मोठा धक्का बसला आहे. सुमार कामगिरीमुळे त्याचे अव्वल स्थान हिरावले गेले असून तो थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दुसरीकडे, इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकने मुसंडी मारत कसोटीतील सर्वोत्तम फलंदाजाचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत जो रूटला पहिल्या डावात केवळ 1 धाव आणि दुसऱ्या डावात अवघ्या 8 धावा करता आल्या, ज्याचा फटका त्याला रँकिंगमध्ये सहन करावा लागला.

हॅरी ब्रूक पहिल्या तर ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर; रूट तिसऱ्या स्थानी
ताज्या रँकिंगनुसार, हॅरी ब्रूक 869 रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड यानेही एका स्थानाची प्रगती केली असून तो 853 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. दोन स्थानांचे नुकसान झालेला जो रूट आता 851 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर कायम आहे, तर श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने एका स्थानाची सुधारणा करत पाचवे स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन फॉर्मअभावी एका स्थानाने खाली घसरून 780 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आला आहे, तर टेंबा बावुमा सातव्या स्थानावर स्थिर आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पंड्याची साडेसाती सुरूच! आधी IPL मध्ये निराशाजनक कामगिरी, आता वनडे मालिकेतूनही बाहेर; नेमकं काय बिनसलं?

भारतीय गोटात संमिश्र वातावरण; शुभमन गिलची टॉप-10 मध्ये मोठी झेप 
भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने आयसीसी क्रमवारीत दोन स्थानांची शानदार झेप घेत थेट आठवे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात गिलने ठोकलेल्या 126 धावांच्या धडाकेबाज शतकी खेळीचा त्याला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला असून त्याचे रेटिंग आता 743 झाले आहे. दुसरीकडे, भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला मात्र एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या क्रमांकावर घसरला आहे. श्रीलंकेच्या दिनेश चंडीमलने एक पाऊल पुढे टाकत टॉप-10 मध्ये दहावे स्थान मिळवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number