TET Paper Leak : मोठी बातमी! TET चा पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीमुळे प्रशासनाने तडकाफडकी रद्द केली आहे. परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

TET Paper Leak : मोठी बातमी! TET चा पेपर फुटला; उद्या होणारी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड

TET Exam Cancelled: देशभरात गाजलेल्या NEET परीक्षा घोटाळ्यानंतर आता महाराष्ट्रातही परीक्षा यंत्रणेचे धिंडवडे समोर आले आहेत. उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीमुळे प्रशासनाने तडकाफडकी रद्द केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्याने राज्यभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. यंदा या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून तब्बल 4,28,122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 45,562 परीक्षार्थी नशीब अजमावणार होते, मात्र ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येला हा मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – Gold – Silver Price : ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात अडीच हजार तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ

ठाण्यातून पेपर लीक; लाखो विद्यार्थ्यांचा ऐनवेळी खोळंबा
प्राथमिक तपासानुसार, हा परीक्षा पेपर ठाणे परिसरातून फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजताच परीक्षा मंडळाने कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा पेपर नेमका कोणत्या टोळीने किंवा यंत्रणेमार्फत बाहेर काढला, याचा शोध अद्याप लागलेला नाही. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची किंवा प्रवासाची तयारी करत असतानाच परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज धडकल्याने लाखो उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.

परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
TET परीक्षेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी झालेल्या परीक्षेतही गुणांची फेरफार करून अनेकांना बेकायदेशीरपणे पास करण्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. त्या जुन्या प्रकरणाच्या चौकशीचा वाद अजून शांत होत नाही तोच, दीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या परीक्षेचा थेट पेपरच फुटल्याने शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या रॅकेटचा सखोल शोध घेतला जात असून, परीक्षेच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number