EPFO 3.0: पीएफ धारकांसाठी मोठी बातमी; आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार पैसे; ‘EPFO 3.0’ ची चाचणी यशस्वी

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमधील व्यवहारांची पद्धत पूर्णपणे हायटेक आणि आधुनिक करण्यासाठी 'EPFO 3.0' या नव्या प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे.

EPFO 3.0: पीएफ धारकांसाठी मोठी बातमी; आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार पैसे; ‘EPFO 3.0’ ची चाचणी यशस्वी

EPFO 3.0: 'एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन' (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक मोठा तांत्रिक बदल करण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमधील व्यवहारांची पद्धत पूर्णपणे हायटेक आणि आधुनिक करण्यासाठी 'EPFO 3.0' या नव्या प्रणालीवर वेगाने काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पीएफ धारकांना आता थेट युपीआय (UPI) किंवा एटीएम (ATM) चा वापर करून आपल्या खात्यातून पैसे काढता येणार आहेत. ही संपूर्ण प्रणाली जलद, अत्यंत पारदर्शक आणि कागदविरहित (Paperless) असणार आहे, ज्यामुळे पीएफ सेवांचे व्यवस्थापन करणे कमालीचे सोपे होईल.

अंमलबजावणीची तारीख निश्चित झाली का? 

'EPFO 3.0' अंतर्गत युपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळणार असल्याने नोकरदार वर्गात मोठी उत्सुकता आहे. ही नवी सेवा कधीपासून प्रत्यक्ष सुरू होणार, याबाबत अनेक सदस्य सोशल मीडियावर सातत्याने विचारणा करत आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन डिजिटल प्रणालीची प्राथमिक चाचणी (Testing) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मात्र, ही सेवा अधिकृतपणे सुरू करण्याची अचूक तारीख किंवा महिना अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की, या प्रणालीच्या अंमलबजावणीची घोषणा लवकरच केली जाईल.

कागदपत्रांचा खटाटोप संपणार 

'EPFO 3.0' चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यामुळे पीएफ धारकांना मिळणारा सुटसुटीतपणा. या प्रणालीद्वारे पीएफची रक्कम थेट बँक खात्यांशी आणि पडताळणीकृत माध्यमांशी जोडलेल्या खात्यांमध्ये UPI किंवा ATM-सक्षम पर्यायांद्वारे त्वरित हस्तांतरित केली जाईल. या आधुनिक पद्धतीमुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचा आणि मंजुरीसाठी लागणारा वेळेचा मोठा अपव्यय टळणार आहे. परिणामी, क्लेम सेटलमेंटची एकूण प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल.

हेही वाचा – TDS on Fixed Deposit : मुदत ठेवीवर (FD) व्याज कमावताय? मग 'Form 121' नक्की भरा, नाहीतर बँक कापणार TDS; जाणून घ्या नवीन नियम

PF शिल्लकीपैकी 50 टक्के ते 75 टक्के रक्कम काढता येण्याची शक्यता 

दरम्यान, नव्याने प्रस्तावित केलेल्या आराखड्यानुसार, पात्र पीएफ सदस्यांना त्यांच्या एकूण ईपीएफ (EPF) शिल्लकीपैकी किमान 50 टक्के ते कमाल 75 टक्के पर्यंतची रक्कम थेट काढण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, यासाठी काही नियम व अटी लागू असतील, ज्या ही प्रणाली अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर जाहीर केल्या जातील. ही नवीन व्यवस्था पूर्णपणे लागू झाल्यावर, पीएफचे अनेक गुंतागुंतीचे दावे (Claims) अवघ्या काही दिवसांत निकाली काढणे शक्य होईल, असा ठाम विश्वास 'EPFO' प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number