पूरग्रस्तांना केंद्राची मदत मिळणार – मुख्यमंत्री

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असला तरी धरणातील पाणी सोडल्यामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री ? मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती असल्यामुळे नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळे […]

पूरग्रस्तांना केंद्राची मदत मिळणार – मुख्यमंत्री

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस ओसरला असला तरी धरणातील पाणी सोडल्यामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती असल्यामुळे नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे.

त्यामुळे पूरग्रस्तांना योग्य मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

97 हजार लोक स्वतःहून स्थलांतर झाले असून 152 ठिकाणी 38 हजार लोक सुरक्षित आहेत.

केंद्राशी संपर्क साधून इतर राज्यातील बचाव टीम, आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड कोल्हापुरात कार्यरत आहेत.

सांगलीला उतरणे शक्य नसल्याने हवाई पाहणी केली.

भयंकर स्थिती पाहायला मिळाली सांगलीत 11 टीम होत्या. तिथे नेव्ही, NDRF, SDRF या पोहोचतंय. ज्यादाची कुमक पाठवण्यात येतेय.

एअर लिफ्टची तयारी ठेवण्यात आली आहे.

223 कोल्हापूरातील गावे बाधित आहेत. 18 गावांना पूर्ण वेढा.

कोल्हापुरात 4 व्यक्तींचा मृत्यू, यापैकी 2 झाड पडल्याने मृत्यू.

पाणी ओसरल्यानंतर नेमकं नुकसान लक्षात येईल.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत करू.

3 हजारांपेक्षा अधिक घरांचं मोठं नुकसान.

राष्ट्रीय आपत्ती योग्यवेळी जाहीर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

राजनाथ सिंह, अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू आहे.

पूरग्रस्तांना केंद्राची मदत मिळणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले.

सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number