BCCI vs BCB : टी-20 विश्वचषकापूर्वी भारत-बांगलादेशमध्ये तणाव! मुस्तफिजूरच्या मुद्द्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डचा नवीन ड्रामा

स्पर्धा सुरू होण्यास केवळ 1 महिना शिल्लक असताना अशा प्रकारे स्थळ बदलणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

BCCI vs BCB : टी-20 विश्वचषकापूर्वी भारत-बांगलादेशमध्ये तणाव! मुस्तफिजूरच्या मुद्द्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डचा नवीन ड्रामा

BCCI vs BCB : आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी अवघा काही काळ शिल्लक असताना, भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक तणावाची ठिणगी आता क्रिकेटच्या मैदानावरही पडली आहे. बांगलादेशने त्यांचे नियोजित सामने भारतातून थेट श्रीलंकेत हलवण्याची अधिकृत मागणी केली असून, या मागणीमुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या सूचनेवरून बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे.

सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी

बांगलादेश सरकारचे सल्लागार आसिफ नजरल यांनी या प्रकरणाला सुरक्षेचा आणि राजकीय सन्मानाचा विषय बनवले आहे. त्यांच्या मते, जर केकेआरने 9.20 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या मुस्तफिजूर रहमानला राजकीय परिस्थितीचा हवाला देऊन खेळण्यापासून रोखले जात असेल, तर संपूर्ण राष्ट्रीय संघाच्या सुरक्षेबद्दल शंका निर्माण होते. याच कारणामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून त्यांचे भारतातील सर्व सामने इतरत्र हलवण्याचा आग्रह धरला आहे.

वेळापत्रकावर नजर टाकल्यास, बांगलादेशचे पहिले 3 सामने कोलकाता येथे 7 फेब्रुवारी (वेस्ट इंडिज), 9 फेब्रुवारी (इटली) आणि 14 फेब्रुवारी (इंग्लंड) रोजी होणार आहेत. त्यानंतर त्यांचा साखळी फेरीतील अंतिम सामना मुंबईत 17 फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध खेळवला जाणार आहे. हे सर्व 4 सामने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत खेळवावेत, अशी मागणी बांगलादेशने लावून धरली आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला टीम इंडियाचे उपकर्णधारपद मिळणार, पण; आधी पूर्ण करावी लागेल, BCCI ची 'ही' मोठी अट

केवळ एका देशाच्या हट्टापायी..

मात्र, बीसीसीआयने या विचित्र मागणीला अत्यंत सडेतोड उत्तर दिले आहे. स्पर्धा सुरू होण्यास केवळ 1 महिना शिल्लक असताना अशा प्रकारे स्थळ बदलणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. "केवळ एका देशाच्या हट्टापायी संपूर्ण स्पर्धेची रचना, ब्रॉडकास्टिंग क्रू, हॉटेल बुकिंग आणि सुरक्षा व्यवस्थांची पुनर्रचना करणे जवळजवळ अशक्य आहे," असे बोर्डाच्या सूत्रांनी म्हटले आहे. बीसीसीआयने ही मागणी पूर्णपणे फेटाळून लावत आयसीसीच्या नियमांचे पालन करण्याचे संकेत दिले आहेत.

आयपीएलमधील एका खेळाडूच्या प्रकरणावरून संपूर्ण विश्वचषकाच्या आयोजनात अडथळे निर्माण करण्याचा हा प्रकार अजब मानला जात आहे. आता या वादावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) काय तोडगा काढते आणि बांगलादेशचा संघ भारतात खेळायला येतो की नाही, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – IPL 2026 KKR : बीसीसीआयचे थेट निर्देश! अखेर मुस्तिफिझुर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवला; आता केकेआर कोणाला संधी देणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number