IPL 2026 New Rules: फलंदाजांची वाढणार धाकधूक; यंदा IPL मध्ये दुसऱ्या डावानंतर लागू होणार ‘हा’ नवा नियम

विशेषतः सामन्याच्या दुसऱ्या डावात 10 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर हा नियम लागू होणार असून, यामुळे गोलंदाज आणि फलंदाज दोघांसमोरही नवी आव्हाने उभी ठाकणार आहेत.

IPL 2026 New Rules: फलंदाजांची वाढणार धाकधूक; यंदा IPL मध्ये दुसऱ्या डावानंतर लागू होणार ‘हा’ नवा नियम

IPL 2026 New Rules: आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हाय-व्होल्टेज स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) खेळाच्या नियमावलीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक बदल केला आहे. विशेषतः सामन्याच्या दुसऱ्या डावात 10 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर हा नियम लागू होणार असून, यामुळे गोलंदाज आणि फलंदाज दोघांसमोरही नवी आव्हाने उभी ठाकणार आहेत. दवबिंदूंच्या (Dew Factor) परिणामाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी यावेळचा बदल 'अनिवार्य' स्वरूपाचा असल्याने सामन्यात मोठी उलथापालथ होऊ शकते.

चेंडू बदलण्याबाबतचे नवे निकष
बीसीसीआयने सर्व सहभागी संघांना चेंडू बदलण्याबाबतच्या नवीन नियमांची रीतसर माहिती दिली आहे. जर सामन्यादरम्यान चेंडू स्टेडियमबाहेर गेला किंवा तो अशा ठिकाणी पडला जिथून तो परत मिळवणे शक्य नाही, तर पंच तो बदलतील. तसेच, चेंडू खराब झाल्याचे पंचांना वाटल्यास तो बदलण्याचा अंतिम अधिकार पंचांकडेच असेल. नवीन नियमानुसार, बदलून दिलेला चेंडू हा मूळ चेंडूच्या वैशिष्ट्यांशी (Specifications) मिळताजुळता असणे आवश्यक आहे. चेंडू बदलल्यानंतर त्याची माहिती फलंदाज, गोलंदाज आणि कर्णधार या तिघांनाही देणे पंचांना बंधनकारक असेल.

दुसऱ्या डावातील 10 षटकांचा महत्त्वाचा 'टप्पा'
नव्या नियमानुसार, दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला 10 षटके पूर्ण झाल्यानंतर चेंडू बदलण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, हा नियम केवळ सायंकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांसाठीच लागू असेल. दुपारी 3:30 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यांसाठी हा पर्याय उपलब्ध नसेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एका डावात केवळ एकदाच या पर्यायाचा वापर करता येईल. विशेष म्हणजे, हा बदल केवळ एखादे षटक (Over) पूर्ण झाल्यानंतरच करता येईल; षटकाच्या मधल्या चेंडूवर असा बदल करता येणार नाही.

हेही वाचा – IPL 2026: चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा कायमस्वरूपी राहणार रिकाम्या; RCB ने 'या' कारणामुळे घेतला निर्णय

'अनिवार्य' अट ठरणार निर्णायक
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी नियमात एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 10 षटकांच्या समाप्तीनंतर जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने चेंडू बदलण्याची विनंती केली, तर तो बदलणे आता पंचांसाठी 'अनिवार्य' (Mandatory) असेल. मैदानावर दव पडलेले असो वा नसो, एकदा विनंती केल्यावर चेंडू बदलावाच लागेल. पंच यावेळी मूळ चेंडूच्या स्थितीशी मिळताजुळता चेंडू उपलब्ध करून देतील. या अनिवार्य अटीमुळे दव असताना चेंडू निसटण्याच्या समस्येवर गोलंदाजांना मात करता येईल, मात्र चेंडूची स्थिती बदलल्यामुळे फलंदाजांच्या रणनीतीवरही याचा मोठा परिणाम होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number