मोठा निर्णय! वांद्रे मेट्रो ते रेल्वे स्थानक थेट जोडणारा 278 मीटरचा पादचारी पूल; MMRDA ने थेट तारीखच सांगितली

मेट्रो आणि लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एका वाहतूक सेवेतून दुसऱ्या सेवेत सहज प्रवेश करता यावा, यासाठी वांद्रे मेट्रो स्थानक आणि वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक जोडण्यात येणार आहे.

मोठा निर्णय! वांद्रे मेट्रो ते रेल्वे स्थानक थेट जोडणारा 278 मीटरचा पादचारी पूल; MMRDA ने थेट तारीखच सांगितली

Bandra Metro Foot Overbridge : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ‘अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द’ या मेट्रो लाईन 2B मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो आणि लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एका वाहतूक सेवेतून दुसऱ्या सेवेत सहज प्रवेश करता यावा, यासाठी वांद्रे मेट्रो स्थानक आणि वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक जोडण्यात येणार आहे. या दोन्ही प्रमुख स्थानकांना जोडण्यासाठी 278 मीटर लांबीचा एक आधुनिक पादचारी पूल (FOB) उभारला जाणार आहे.

40.99 कोटींचा खर्च आणि 18 महिन्यांची मुदत
या विशेष पुलाच्या उभारणीसाठी एकूण 40.99 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रियेमध्ये आर. के. माधानी अँड कंपनी, एबी इन्फ्राबिल्ड आणि साई प्रोजेक्टसह एकूण 7 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. अखेर सर्वात कमी बोली लावून कंत्राट जिंकणाऱ्या आर. के. माधानी अँड कंपनीला एमएमआरडीएकडून स्वीकृतीपत्र सुपूर्द करण्यात आले आहे. या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून ते सुरू झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन कंत्राटदारावर असणार आहे.

हेही वाचा – Pune Shivajinagar Flyover: संचेती-शिमला ऑफिस चौकातील ट्रॅफिक जॅमचा प्रश्न कायमचा संपणार?; शिवाजीनगर उड्डाणपुलाला पालिकेचा ग्रीन सिग्नल

प्रवाशांच्या सुविधेसाठी MMRDA ची नवी रणनीती
मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती मिळावी आणि स्थानकांवरून इच्छितस्थळी पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी एमएमआरडीएकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच धोरणाचा भाग म्हणून मेट्रो स्थानकांना जवळची रेल्वे स्थानके, बस आगार, तसेच निवासी आणि व्यावसायिक संकुलांशी जोडण्यावर भर दिला जात आहे. या नव्या पादचारी पुलामुळे वांद्रे पश्चिम परिसरातील रस्त्यांवर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

2028-29 मध्ये तिसरा टप्पा सेवेत दाखल होण्याचा अंदाज
वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानक हे मेट्रो Line 2B च्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहे. प्राधिकरणाच्या नियोजनानुसार हा टप्पा 2028-29 पर्यंत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टप्पा आणि पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोतून उतरून थेट रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेवरून थेट मेट्रो स्थानकावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

हेही वाचा – Mumbai Local: मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! आता अवघ्या 2 मिनिटांच्या अंतराने धावणार लोकल, 'कवच 5.0'मुळे मोठा बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number