Best Mileage Bike : देशातील पहिली CNG बाईक! सुस्साट धावणारी; बजेटमध्ये फ्रेंडली आणि जबरदस्त फिचर्सही…

केवळ मायलेजच नाही, तर ही बाईक फीचर्सच्या बाबतीतही प्रगत आहे. जगातील पहिली सीएनजी बाईक असण्याचा मान मिळवलेली ही गाडी खिशाला परवडणारीही आहे.

Best Mileage Bike : देशातील पहिली CNG बाईक! सुस्साट धावणारी; बजेटमध्ये फ्रेंडली आणि जबरदस्त फिचर्सही…

Bajaj Freedom 125 CNG Best Mileage Bike : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची चिन्हे आहेत, अशा काळात सर्वसामान्यांचे लक्ष पुन्हा एकदा इंधन बचतीकडे वळले आहे. पेट्रोल पंपांवरील वाढत्या रांगा आणि वाढते दर यावर मात करण्यासाठी बजाज ऑटोची 'Bajaj Freedom 125 CNG' ही बाईक सध्या 'मायलेज टॉपर' म्हणून ओळखली जात आहे. जगातील पहिली सीएनजी बाईक असण्याचा मान मिळवलेली ही गाडी खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक देखील आहे.

इंधन आणि मायलेजचे गणित
बजाज फ्रीडम 125 मध्ये ड्युअल फ्युएल सिस्टीम दिली आहे, ज्यामुळे ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही मोडवर चालवता येते. मायलेजच्या बाबतीत या बाईकने मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत:
CNG मोड: केवळ 1 किलो सीएनजीमध्ये ही बाईक 102 किमी धावते. यात 2 किलोची सीएनजी टाकी असल्याने सीएनजीवर सुमारे 200 किमी प्रवास होतो.
पेट्रोल मोड: पेट्रोलवर ही बाईक 65 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते.
एकूण रेंज: पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधन पूर्ण भरल्यास ही बाईक तब्बल 330 किमी पर्यंतचा प्रवास विनाअडथळा करू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

इंजिन क्षमता आणि परफॉर्मन्स
या बाईकमध्ये 124.6 cc चे एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या ही बाईक अत्यंत कार्यक्षम आहे:
पॉवर आणि टॉर्क : सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते.
वेग: सीएनजीवर चालताना याचा टॉप स्पीड 90.5 किमी प्रति तास आहे, तर पेट्रोलवर हा वेग 93.4 किमी प्रति तास इतका मिळतो.
रचना: सीएनजीची टाकी सीटच्या खाली सुरक्षितपणे बसवण्यात आली आहे, तर समोर पेट्रोलची टाकी दिली आहे.

हेही वाचा – Skoda Kushaq Facelift लाँच; प्रीमियम फीचर्स आणि 'मसाज सीट'सह Creta-Seltos समोर तगडे आव्हान

आधुनिक फीचर्स आणि आरामदायी प्रवास
केवळ मायलेजच नाही, तर ही बाईक फीचर्सच्या बाबतीतही प्रगत आहे. यात LED हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारख्या सोयी देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम आणि ट्युबलेस टायर्सचा वापर केला आहे. बाईकचे वजन 147.8 किलो असून, 825 मिमी उंचीची सीट सर्व प्रकारच्या उंचीच्या व्यक्तींसाठी आरामदायक आहे. तसेच, बजाजचा ब्रँड असल्याने याचा मेंटेनन्स खर्चही अत्यंत कमी आहे.

व्हेरिएंट आणि किंमत (एक्स-शोरूम)
बजाज फ्रीडम 125 सीएनजीमध्ये एकूण 3 व्हेरियंट उपलब्ध आहेत:
NG04 Drum (बेस मॉडेल): 91,566 रुपये.
Drum LED व्हेरिएंट: 1,04,058 रुपये.
Top Disc LED व्हेरिएंट: 1,07,616 रुपये.

हेही वाचा – Smart Driving Tips : गाडी चालवताना AC सुरू ठेवावा की खिडकी उघडी ठेवावी? याचा वेगावर नेमका काय परिणाम होतो?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number