Pune news : पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! औंध-खडकी ट्रॅफिकसाठी ‘गडकरी प्लॅन’ तयार; उड्डाणपूल की भुयारी मार्ग?

खडकी रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्याजवळील हा रस्ता पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. येथील ब्रिटीशकालीन पूल अत्यंत अरुंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

Pune news : पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! औंध-खडकी ट्रॅफिकसाठी ‘गडकरी प्लॅन’ तयार; उड्डाणपूल की भुयारी मार्ग?

Pune news : औंध ते खडकी रेल्वे स्टेशन या मार्गावर दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आता एका मोठ्या प्रकल्पाची तयारी सुरू झाली आहे. या मार्गावर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची भेट घेऊन यासंदर्भात राज्य सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच आश्वासन दिले आहे की, जर राज्य सरकारकडून अधिकृत प्रस्ताव आला, तर केंद्र सरकारच्या 'सेतूबंधन' योजनेतून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

ब्रिटीशकालीन पुलाचा अडथळा आणि अरुंद रस्ता
खडकी रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्याजवळील हा रस्ता पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. औंध, बोपोडी, सांगवी आणि चिखलवाडी येथील हजारो नागरिक कोरेगाव पार्क, विमाननगर आणि येरवडा भागात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र, खडकी पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेला रेल्वेचा ब्रिटीशकालीन पूल अत्यंत अरुंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पावसाळ्यात किंवा ड्रेनेज लाईन खराब झाल्यास या पुलाखाली सांडपाणी साठते, ज्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

हेही वाचा – Solapur News : सोलापूर-मराठवाडा रेल्वेसाठी राज्य शासनाकडून 150 कोटी मंजूर; रखडलेल्या प्रकल्पाला मोठा बूस्टर

सेतूबंधन योजनेतून निधी मिळण्याची शक्यता
सुनील माने यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन गडकरी यांना पत्र दिले होते. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रकल्प केंद्राच्या निधीतून पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी तांत्रिक पाहणी आणि राज्य शासनाची शिफारस आवश्यक आहे. अधीक्षक अभियंता बाविस्कर यांनी या मागणीची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच या परिसराची पाहणी करून योग्य तो आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रस्तावामुळे मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा हा भाग वाहतूक कोंडीमुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

50 हजार नागरिकांना मिळणार दिलासा
औंध रोडवरील या प्रस्तावित उड्डाणपूल किंवा भूमिगत मार्गामुळे केवळ स्थानिक रहिवाशांनाच नाही, तर पुण्यातील महत्त्वाच्या आयटी पार्क्स आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फायदा होईल. खडकी रेल्वे स्थानकाचे नवीन जंक्शन विकसित होत असल्याने भविष्यात या भागातील गर्दी आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत, वेळेत उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यास दररोजच्या ट्रॅफिकला कायमचा ब्रेक लागेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव जलदगतीने पाठवल्यास 2026 च्या अखेरीस या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते.

हेही वाचा – Rajmata Jijau Buses : एसटीच्या ताफ्यात आता 'राजमाता जिजाऊ' बस; पाहा कधीपासून सुरू आणि काय आहेत खास सुविधा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number