Abandoned Vehicles In Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! तुमची गाडी रस्त्यावर धूळ खात असेल तर सावधान; बेवारस गाड्यांवर आजपासून जप्तीचा हातोडा

शहराच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्षे उभी असलेली 'भंगार' वाहने कायमची हटवण्यासाठी बुधवार, 15 एप्रिल 2026 पासून एका विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे.

Abandoned Vehicles In Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! तुमची गाडी रस्त्यावर धूळ खात असेल तर सावधान; बेवारस गाड्यांवर आजपासून जप्तीचा हातोडा

Abandoned Vehicles In Pune: पुण्यातील रस्त्यांचा श्वास रोखणाऱ्या बेवारस आणि धूळखात पडलेल्या वाहनांवर आता वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्षे उभी असलेली 'भंगार' वाहने कायमची हटवण्यासाठी बुधवार, 15 एप्रिल 2026 पासून एका विशेष मोहिमेला सुरुवात झाली आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला असून, यामुळे अरुंद रस्ते आणि गल्ल्यांना मोकळा श्वास मिळणार आहे.

केवळ 24 तासांचा अल्टिमेटम
पोलिसांनी आता केवळ नोटिशीवर न थांबता थेट कृतीवर भर दिला आहे. नवीन नियमावलीनुसार कारवाईचा वेग प्रचंड वाढवण्यात आला आहे. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या कोणत्याही वाहनावर पोलीस तत्काळ 'स्टिकर नोटीस' चिकटवणार आहेत. ही नोटीस लावल्यापासून वाहन मालकाकडे आपले वाहन हटवण्यासाठी केवळ 24 तासांचा अवधी असेल. या काळात वाहन न हटवल्यास ते अधिकृतपणे 'बेवारस' मानले जाईल आणि मुदत संपताच पुढील 48 तासांच्या आत टोईंग व्हॅनद्वारे ती गाडी उचलून जप्त केली जाईल.

मोठा आर्थिक दंड; जप्त वाहन सोडवणे होणार कठीण
ही मोहीम पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस संयुक्तपणे राबवत आहेत. जप्त केलेली सर्व वाहने महापालिकेच्या सुरक्षित गोदामात हलवली जाणार आहेत. एकदा का गाडी जप्त झाली, की ती परत मिळवणे मालकासाठी खर्चिक ठरणार आहे. वाहन मालकाला गाडी सोडवण्यासाठी मोठा आर्थिक दंड भरावा लागेल. जोपर्यंत दंडाच्या रकमेची पावती दाखवली जात नाही, तोपर्यंत हक्काची गाडीही परत मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्टपणे ठणकावून सांगितले आहे.

हेही वाचा – PMC Building Demolition Rule: पुण्यात आता मनमानी पाडकामाला लगाम; जुन्या इमारती पाडण्यासाठी महापालिकेची कडक नियमावली लागू

'PTP' अ‍ॅपद्वारे नागरिक देऊ शकणार तक्रार
पुण्याला ट्रॅफिक जाममधून मुक्त करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. तुमच्या गल्लीत, घराबाहेर किंवा सार्वजनिक रस्त्यावर एखादी गाडी अनेक दिवसांपासून बेवारस पडली असेल, तर त्याची माहिती तुम्ही 'PTP' (Pune Traffic App) वर त्वरित अपलोड करू शकता. तुमच्या एका तक्रारीनंतर पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचून जप्तीची प्रक्रिया सुरू करतील. ही मोहीम पुण्याच्या वाहतूक नियोजनासाठी अत्यंत निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number