Pune Traffic Updates: पुणेकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य पुण्यात ‘नो एन्ट्री’; रथयात्रेमुळे वाहतूक मार्गांत मोठे बदल

या सोहळ्यादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन कोंडी होऊ नये, यासाठी विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गांवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत.

Pune Traffic Updates: पुणेकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य पुण्यात ‘नो एन्ट्री’; रथयात्रेमुळे वाहतूक मार्गांत मोठे बदल

Pune Traffic Updates: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन कोंडी होऊ नये, यासाठी विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गांवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. दुपारी 3:00 ते रात्री 8:30 या वेळेत जे नागरिक घराबाहेर पडणार आहेत, त्यांनी आधीच वाहतुकीचे नियोजन बदलणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.

स. प. महाविद्यालयापासून सुरू होणाऱ्या सोहळ्याचा मार्ग

प्राप्त माहितीनुसार, रथयात्रा दुपारी 3 वाजता स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणातून मार्गस्थ होईल. तिथून पुढे टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक आणि टिळक चौक अशी फिरून ही यात्रा पुन्हा स. प. महाविद्यालयात परतणार आहे. हा संपूर्ण मार्ग यात्रेच्या वेळेत व्यस्त राहणार असल्याने या परिसरातील वाहतूक इतर रस्त्यांवर वळवली जाईल.

हेही वाचा – Sharad Pawar on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; केंद्र सरकारवर गंभीर आरोप

कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचे वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन
रथयात्रेच्या काळात टिळक रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक परिस्थितीनुसार इतर मार्गांवर वळवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. मध्य पुण्यात अडकून पडण्यापेक्षा चालकांनी आधीच पर्यायी रस्त्यांचा वापर करून आपला प्रवास सोयीचा करावा.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number