Mega Block Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक; ‘हे’ वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.<br/>

Mega Block Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक; ‘हे’ वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा

Mega Block Update:  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध तांत्रिक कामे आणि रूळांच्या देखभालीसाठी रविवार, 5 एप्रिल 2026 रोजी उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हार्बर मार्गावरील बदलांचा तपशील
पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11:05 ते सायंकाळी 4:05 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) हा ब्लॉक असेल.
रद्द होणाऱ्या फेऱ्या: पनवेलवरून सीएसएमटीकडे जाणारी 'अप' सेवा सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, सीएसएमटीवरून पनवेल-बेलापूरकडे जाणारी 'डाऊन' सेवा सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
पर्यायी व्यवस्था: ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते वाशी या दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.

ट्रान्स-हार्बर मार्गाची स्थिती
ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवांवरही या ब्लॉकचा परिणाम होईल.
अप मार्ग: पनवेल ते ठाणे सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 वाजेपर्यंत लोकल उपलब्ध नसतील.
डाऊन मार्ग: ठाणे ते पनवेल सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 वाजेपर्यंत फेऱ्या रद्द राहतील.
सुरू राहणारी सेवा: ठाणे-वाशी आणि नेरुळ दरम्यानची वाहतूक नियमित सुरू राहील.

पोर्ट मार्ग आणि इतर सेवा
ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान 'पोर्ट मार्ग' (Port Line) वरील लोकल सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा – MHADA Water Tank: वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सापडल्या अळ्या

रेल्वे प्रशासनाचे आवाहन
रेल्वेच्या पायाभूत सुविधांची मजबुती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. रविवारच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करणाऱ्या मुंबईकरांनी या वेळेची नोंद घेऊनच प्रवास करावा.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number