LPG eKYC Update: गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! प्रत्येकालाच e-KYC करण्याची गरज नाही, जाणून घ्या कोणासाठी आहे अनिवार्य

सरकारने स्पष्ट केले आहे की, e-KYC ही काही नवीन सक्ती नसून, केवळ बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आणि खऱ्या ग्राहकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सुरू असलेली एक निरंतर प्रक्रिया आहे.

LPG eKYC Update: गॅस ग्राहकांनो लक्ष द्या! प्रत्येकालाच e-KYC करण्याची गरज नाही, जाणून घ्या कोणासाठी आहे अनिवार्य

LPG eKYC Update: एलपीजी ग्राहकांसाठी आधार-आधारित बायोमेट्रिक e-KYC अनिवार्य करण्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, केंद्र सरकारने यावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, e-KYC ही काही नवीन सक्ती नसून, केवळ बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आणि खऱ्या ग्राहकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सुरू असलेली एक निरंतर प्रक्रिया आहे. विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांनी यापूर्वीच आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना ती पुन्हा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. ही प्रक्रिया केवळ अशाच ग्राहकांसाठी आहे ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही.

कोणाला आहे गरज? उज्ज्वला योजना आणि सबसिडीचे नियम
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान उज्ज्वला योजनेव्यतिरिक्त (Non-PMUY) असणाऱ्या ग्राहकांनी एकदा e-KYC केले असल्यास त्यांना पुन्हा ते करण्याची गरज नाही. मात्र, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना दर आर्थिक वर्षात एकदा ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. विशेषतः, एका वर्षात पहिले 7 रिफिल्स (सिलिंडर) घेतल्यानंतर, 8 व्या आणि 9 व्या सिलिंडरवर मिळणारी सबसिडी (DBT) सुरळीत सुरू राहण्यासाठी हे ग्राहक बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य ठरते. e-KYC मुळे निधी थेट पात्र ग्राहकाच्या खात्यात जमा होतो आणि गॅस सिलिंडरचा काळाबाजार किंवा गैरवापर रोखण्यास मोठी मदत होते.

सबसिडी थांबणार नाही आणि प्रक्रिया पूर्णपणे मोफत
ग्राहकांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे, e-KYC पूर्ण न केल्यामुळे एलपीजी सबसिडी बंद होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून ग्राहकांनी कोणत्याही एजन्सीला पैसे देण्याची गरज नाही. e-KYC मुळे केवळ वितरणातील पारदर्शकता वाढते आणि सरकारी निधीचा अपव्यय टाळला जातो. पात्रतेबाबत स्पष्टता आणण्यासाठी आणि व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त ग्राहकांना हे प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – Namo Shetkari Yojana: पीएम किसान योजने पाठोपाठ आता नमो शेतकरीचाही हप्ता होणार जमा; 1774 कोटींचा निधी मंजूर

घरबसल्या करा e-KYC: 'फेस ऑथेंटिकेशन'चा सोपा पर्याय
गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याऐवजी ग्राहक आता आपल्या मोबाईलवरूनही e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी आपल्या एलपीजी कंपनीचे अधिकृत ॲप आणि 'Aadhaar FaceRD' हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शनशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून लॉग-इन करून 'e-KYC' पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकून फेस ऑथेंटिकेशनद्वारे (चेहरा स्कॅन करून) ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करता येते. प्रमाणीकरण यशस्वी होताच प्रणालीद्वारे पुष्टी केली जाते आणि आपले गॅस कनेक्शन अद्ययावत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number