Asia Cup 2025 Trophy: आशिया कपच्या विजेतेपदाबाबत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि त्यांचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पराभव स्वीकारत टीम इंडियाला आशिया कप ट्रॉफी मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एसीसीने (Asian Cricket Council) ही ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली असून, लवकरच ती बीसीसीआयकडे (BCCI) हस्तांतरित केली जाणार आहे. दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय मिळवत जेतेपद पटकावले होते.
ट्रॉफी स्वीकारण्यावरून वाद
ट्रॉफी सादरीकरणावेळी एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी स्टेजवर आले होते. मात्र, भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला की, ते नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नक्वी ट्रॉफी घेऊन परत गेले.
हेही वाचा – Mohsin Naqvi : आशिया कप ट्रॉफी वादाप्रकरणी मोहसिन नक्वीला 72 तासांचा अल्टिमेटम; अन्यथा खावी लागेल जेलची हवा
बीसीसीआयची कडक भूमिका
दुबईत झालेल्या एसीसी बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी मोहसिन नक्वी यांना कठोर शब्दांत सुनावले. त्यांनी स्पष्ट केले की, विजेता भारत आहे आणि ट्रॉफी त्यालाच मिळायला हवी. बीसीसीआयने हे प्रकरण निकाली निघाले नाही तर आयसीसीकडे तक्रार करण्याची तयारीही दाखवली होती.
हेही वाचा – Women Cricket World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताची दमदार सुरुवात; श्रीलंकेवर 59 धावांनी विजय
अखेर भारताचा विजय मान्य
दरम्यान, एसीसीने परिस्थिती हाताळत ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सोपवली आहे. तिथून लवकरच ती अधिकृतपणे भारताला दिली जाणार आहे. भारताने मैदानावरच नव्हे तर रणनीतिकदृष्ट्याही पाकिस्तानवर मात करत आशिया कप जिंकला आहे.