Ashok Kharat Case : अशोक खरातच्या पापांचा घडा भरला! 300 हून अधिक क्लिप्स पोलिसांच्या ताब्यात; SIT कडून ‘या’ तीन संस्थांना पत्र

आयपीएस (IPS) तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती खरातचे 300 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ लागले आहेत.

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या पापांचा घडा भरला! 300 हून अधिक क्लिप्स पोलिसांच्या ताब्यात; SIT कडून ‘या’ तीन संस्थांना पत्र

Ashok Kharat Case : स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्मांचे एकामागून एक धक्कादायक पदर उलगडत असून, आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. आयपीएस (IPS) तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती खरातचे 300 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ लागले आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून खरातच्या अघोरी कृत्यांचे पुरावे गोळा केले जात आहेत.

तीन मोठ्या यंत्रणांना 'एसआयटी'चे पत्र
अशोक खरातची आर्थिक नाडी आवळण्यासाठी आणि त्याच्या परदेशवारीचा छडा लावण्यासाठी SIT ने आक्रमक पावले उचलली आहेत. तपास पथकाने खालील तीन विभागांना अधिकृत पत्रे पाठवून माहिती मागवली आहे:
आयकर विभाग (Income Tax): खरातचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि बेहिशोबी संपत्ती तपासण्यासाठी.
मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग: खरातने जमवलेल्या स्थावर मालमत्तांची आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे तपासण्यासाठी.
पासपोर्ट विभाग: खरातने आतापर्यंत किती वेळा आणि कोणत्या कारणांसाठी परदेश दौरे केले, याची माहिती मिळवण्यासाठी.

'ओकस प्रॉपर्टी' ठरले गुन्ह्यांचे मुख्य केंद्र
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'ओकस प्रॉपर्टी' हे ठिकाण खरातच्या सर्व काळ्या कृत्यांचे मुख्य केंद्र होते. जप्त करण्यात आलेले व्हिडिओ 2024 मधील असून, ते गेल्या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीतील असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. पीडित महिलांना पाणी पाजून त्यांना गुंगी दिली जात होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा – Sanjay Shirsat: 'अशोक खरातची अनेक प्रकरणं बाहेर पडतील, पण…' संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ
अशोक खरातला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासात आरोपी सहकार्य करत नसल्याचे आणि गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिल पर्यंत म्हणजेच 3 दिवसांची वाढ केली आहे. तक्रारदार महिलांना दिले जाणारे पाणी संशयास्पद असून, त्यामध्ये अमली पदार्थ किंवा गुंगीकारक द्रव्य होते का? याचा फॉरेन्सिक तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number