Ashadhi Wari 2026: आषाढी वारी पालखी सोहळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठे बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

वाहतूक कोंडी टाळणे आणि वारी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पाडणे हाच या बदलांमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ashadhi Wari 2026: आषाढी वारी पालखी सोहळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठे बदल; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

Ashadhi Wari Pune Traffic Updates : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार असून, संपूर्ण जिल्हा प्रशासन आता तयारीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. लाखो वारकरी या वारीत पायी चालत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पालखी बंदोबस्त 11 ते 15 जुलै या कालावधीत तैनात केला जाईल. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि अपघात टळावेत, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत विनाकारण पालखी मार्गावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे-सासवड आणि दिवेघाट मार्गावरील निर्बंध
दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे पुण्याकडून सासवडकडे जाणारी वाहतूक 11 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 13 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्णपणे थांबवली जाईल. या काळात वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रशासनाने खालीलप्रमाणे पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे:
पुण्याकडून सासवडकडे जाण्यासाठी: खडी मशीन चौक–कात्रज–कापूरहोळ या मार्गाचा वापर करावा.
सासवडकडून पुण्याकडे येण्यासाठी: वाहने गराडे–खेड–शिवापूर मार्गे वळविण्यात आली आहेत.

हेही वाचा – Tulshi Archan : विठूरायाच्या भक्तांसाठी मोठी बातमी! विठ्ठल-रुक्मिणीमातेची 'तुळशी अर्चन पूजा' सुरू; अशी करा ऑनलाईन नोंदणी

सासवड-जेजुरी-वाल्हे आणि लोणंद टप्प्यातील नियोजन
पालखी सोहळा जसा पुढे सरकेल, तसे 13 जुलै रोजी पहाटे 2 ते 14 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा मार्गावरील नेहमीची वाहतूक बंद केली जाईल. या टप्प्यासाठी वाहनचालकांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा. यानंतर, वारी जेव्हा वाल्हे ते लोणंद टप्प्यात असेल, म्हणजेच 15 जुलै रोजी पहाटे 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तेव्हा पुणे-निरा मार्गावरील प्रवासासाठी सासवड–जेजुरी–मोरगाव हा पर्यायी रस्ता निश्चित करण्यात आला आहे.

लोणंद-फलटण परिसरातील शेवटचा टप्पा
वारीच्या पुढील प्रवासात 15 ते 18 जुलै या दरम्यान लोणंद आणि फलटण परिसरात विशेष वाहतूक व्यवस्था लागू राहील. या संपूर्ण चार दिवसांच्या कालावधीत फलटण तसेच लोणंद येथून पुण्याकडे येणारी आणि पुण्याहून या दोन्ही शहरांकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेट शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य पालखी मार्गावर वाहनांची गर्दी होणार नाही आणि वारकऱ्यांचा प्रवासही निर्विघ्नपणे पार पडेल.

वाहतूक कोंडी टाळणे आणि वारी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पाडणे हाच या बदलांमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे आधीच नियोजन करावे. तसेच रस्तावर तैनात असलेल्या पोलीस यंत्रणा व स्वयंसेवकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

हेही वाचा – Trimbakeshwar Amrit Kund Shivling: त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवांच्या पिंडीचे दुर्लभ दर्शन! 65 फूट खोल ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी सापडले प्राचीन शिवलिंग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number