Ashadhi Ekadashi Special Trains: विठूरायाच्या भक्तांसाठी रेल्वेची भेट; आषाढी वारीसाठी पुणे, नागपूर आणि कोल्हापूरवरून सुटणार ‘या’ विशेष गाड्या

विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून रेल्वेने 3 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या, या गाड्या कोणत्या मार्गावर धावणार आहेत...

Ashadhi Ekadashi Special Trains: विठूरायाच्या भक्तांसाठी रेल्वेची भेट; आषाढी वारीसाठी पुणे, नागपूर आणि कोल्हापूरवरून सुटणार ‘या’ विशेष गाड्या

Ashadhi Ekadashi Special Trains : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून रेल्वेने 3 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डुवाडी आणि पुणे-मिरज या मार्गांचा समावेश असून, यामुळे पुणे, सांगली, कोल्हापूर, मिरज, सांगोला आणि पंढरपूर परिसरातील लाखो वारकऱ्यांना प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर ते मिरज विशेष ट्रेनचे वेळापत्रक आणि डब्यांची माहिती
नागपूर आणि मिरज दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या फेऱ्या मर्यादित दिवसांसाठी असतील. गाडी क्रमांक 01205 नागपूर-मिरज विशेष ट्रेन 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरहून सकाळी 8.50 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजेत पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01206 मिरज-नागपूर विशेष ट्रेन 24 आणि 25 जुलै रोजी मिरज स्थानकावरून दुपारी 12.55 वाजता सुटेल. या गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला आणि पंढरपूर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. १८ डब्यांच्या या ट्रेनमध्ये 10 शयनयान (Sleeper), 4 सामान्य (General), 2 वातानुकूलित (AC) आणि 2 एसएलआरडी (SLRD) कोच जोडण्यात आले आहेत.

कोल्हापूर ते कुर्डुवाडी दरम्यान रोज धावणार विशेष गाडी
कोल्हापूर आणि कुर्डुवाडी दरम्यानची विशेष सेवा 22 ते 29 जुलै या कालावधीत दररोज उपलब्ध असणार आहे. गाडी क्रमांक 01209 कोल्हापूर-कुर्डुवाडी विशेष ट्रेन कोल्हापूर येथून दररोज सकाळी 6.10 वाजता सुटून सकाळी 7.30 वाजता मिरजेत येईल आणि तिथून 7.50 वाजता पुढे कुर्डुवाडीसाठी रवाना होऊन दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01210 कुर्डुवाडी-कोल्हापूर विशेष रेल्वे कुर्डुवाडीवरून दुपारी 4.30 वाजता सुटेल आणि रात्री 10.30 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. या मार्गावर मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सलगरे, बेडकिहाळ, आरग, जयसिंगपूर आणि हातकणंगले या महत्त्वाच्या स्थानकांवर गाडी थांबणार आहे.

हेही वाचा – Indian Railway Refund Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रवास पूर्ण झाल्यावरही मिळू शकतो तिकीटाचा रिफंड; रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहिती आहे का?

पुणे ते मिरज विशेष ट्रेनचे सविस्तर मार्ग आणि वेळा
पुण्याहून पंढरपूर मार्गे मिरजेकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी देखील विशेष रेल्वे चालवली जात आहे. गाडी क्रमांक 01207 पुणे-मिरज विशेष ट्रेन 23 ते 29 जुलै या काळात दररोज पुण्यातून सकाळी 8.40 वाजता सुटेल. ही गाडी हडपसर, उरुळी, दौंड, जेजुरी, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग मार्गे सायंकाळी 6.45 वाजता मिरज येथे पोहोचेल. परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 01208 मिरज-पुणे विशेष रेल्वे 24 ते 30 जुलै या दरम्यान मिरज येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल आणि पंढरपूर मार्गाने जात पहाटे 4.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

वारीतील गर्दी व्यवस्थापनासाठी प्रशासनाची सज्जता
आषाढी वारीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेने केलेले हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या विशेष गाड्यांमुळे दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील भाविकांना थेट पंढरपूर व आसपासच्या भागात जाणे सोपे झाले आहे. ग्रामीण भागातील छोट्या स्थानकांवरही या गाड्यांना थांबे दिल्याने मळणी, शेतीकाम आटोपून वारीला निघणाऱ्या सामान्य वारकऱ्यांना रेल्वे स्थानकावर पोहोचून थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – Indian Railways Changes Luggage Rules: प्रवाशांसाठी खुशखबर; रेल्वे सामान नियमांमध्ये मोठा बदल, आता घेऊन जाता येणार…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number