Asha Bhosle : ‘हे’ गाणं गायची आशाताईंची इच्छा राहिली अपुरी! 92 व्या वर्षी संगीत सम्राज्ञीचा प्रवास थांबला

आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत हजारो गाणी गायली, परंतु एक गाणे आपल्या वाट्याला यायला हवे होते, अशी खंत काही दिवसापूर्वी बोलून दाखवली होती.

Asha Bhosle : ‘हे’ गाणं गायची आशाताईंची इच्छा राहिली अपुरी! 92 व्या वर्षी संगीत सम्राज्ञीचा प्रवास थांबला

The song Asha Bhosle Always Wanted to Sing : भारतीय संगीत विश्वातील एक अढळ तारा, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (12 एप्रिल 2026) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा सर्वांना होती, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच नव्हे, तर जागतिक कला क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक महान गायिका काळाच्या पडद्याआड गेली आहे.

'त्या' एका गाण्याची राहिली आयुष्यभर खंत
आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत हजारो गाणी गायली, परंतु एक गाणे आपल्या वाट्याला यायला हवे होते, अशी खंत त्यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत व्यक्त केली होती. ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले 'तुम जो हुए मेरे हमसफर' हे गाणे गायची त्यांची तीव्र इच्छा होती. हे गाणे आपण अधिक चांगल्या पद्धतीने गाऊ शकलो असतो, असे त्यांना मनापासून वाटायचे. विविध प्रकारची गाणी गाऊनही या एका गाण्याबाबतची रुखरुख त्यांच्या मनात कायम होती.

हेही वाचा – Asha Bhosle: 'मी त्याला मृत पाहू शकत नाही…'; पंचम दांच्या निधनानंतर आशा ताईंनी का ओलांडला नव्हता खोलीची उंबरठा?

स्वभाव आणि जीवनातील 'ॲडजस्टमेंट'
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत आशाताईंनी त्यांच्या स्वभावाचे पैलू उलगडले होते. त्यांनी सांगितले की, "मी माझा स्वभाव कडक ठेवला असला तरी जीवनात अनेक ठिकाणी तडजोड (ॲडजस्टमेंट) करायला शिकले. जसे आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना अनोळखी व्यक्तीला थोडी जागा देऊन सामावून घेतो, तसेच माणसाने आपल्या आयुष्यातही लोकांना सामावून घेतले पाहिजे." जर समोरचा व्यक्ती तलवारीसारखा कडक असेल, तर आपण म्यान होऊन परिस्थिती सांभाळली पाहिजे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला होता.

'गाणं हाच माझा श्वास'
आपल्या कामाबद्दल बोलताना आशाताई नेहमीच स्पष्टवक्ता होत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, "मी माझ्या आयुष्यात लोकांसाठी तडजोड केली, पण माझ्या गाण्याशी आणि कामाशी मात्र कधीही तडजोड केली नाही. तिथे मी कोणाचेही बोलणे ऐकून घेतले नाही." गाणे हेच त्यांचे जीवन आणि श्वास होते. शेवटपर्यंत गात राहण्याची त्यांची जिद्द ही नव्या पिढीतील कलाकारांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे त्या सदैव श्रोत्यांच्या स्मरणात राहतील.

हेही वाचा – Asha Bhosle Passed Away : भारतीय संगीत क्षेत्रातील दैदीप्यमान तारा निखळला; 20 भाषांत 11,000 हून अधिक गाणी, 'गिनीज बुक'मध्ये नाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number