Navi Mumbai Crime : तिकिटावरून वाद, शिवीगाळ अन् मारहाण; एसटी बसमध्ये नेमकं काय घडलं?

उरण-पेण एसटी बसमध्ये तिकीट काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून चक्क एका महिला कंडक्टरने (वाहकाने) वयस्कर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याने खळबळ माजली आहे.<br/>

Navi Mumbai Crime : तिकिटावरून वाद, शिवीगाळ अन् मारहाण; एसटी बसमध्ये नेमकं काय घडलं?

Navi Mumbai Crime : सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांमधील वादावादीच्या घटना नव्या नाहीत, मात्र नवी मुंबईत एका किरकोळ वादाने अत्यंत हिंसक वळण घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण-पेण एसटी बसमध्ये तिकीट काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून चक्क एका महिला कंडक्टरने (वाहकाने) वयस्कर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याने खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उरण ते पेण या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये तिकीट काढण्यावरून एका प्रवाशाचे महिला कंडक्टरशी शाब्दिक भांडण झालं. ही चकमक इतकी वाढली की, रागाच्या भरात महिला कंडक्टरने आपल्या पदाचे भान विसरून त्या प्रवाशाला थेट मारहाण आणि शिवीगाळ सुरू केली. विशेष म्हणजे, मारहाण होत असलेला प्रवासी वयस्कर असतानाही कंडक्टरने मारणे सुरूच ठेवले.

प्रवाशांची असंवेदनशीलता आणि व्हायरल व्हिडिओ
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बसमधीलच एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एक महिला कंडक्टर वृद्ध माणसाला मारत असताना बसमधील एकही प्रवासी त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला नाही. काही प्रवासी आपल्याला उशीर होत असल्याचे ओरडत होते, तर काही जण या गंभीर प्रकाराकडे बघून हसत होते. यामुळे समाजात हरवत चाललेली माणुसकी आणि संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा – Buldhana Crime : सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, धक्कादायक कारण समोर

संताप आणि कारवाईची मागणी
या मारहाण प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्तव्यावर असताना प्रवाशांशी संयमाने वागण्याऐवजी कायदा हातात घेणाऱ्या या महिला वाहकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एसटी महामंडळ या प्रकरणी काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number