Sunny Deol: ‘रामायण’ विश्वात सनी देओलची दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात भगवान हनुमानाच्या भूमिकेत झळकणार

विशेष म्हणजे या आगामी पौराणिक संगीतमय चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.<br/>

Sunny Deol: ‘रामायण’ विश्वात सनी देओलची दमदार एन्ट्री; ‘या’ चित्रपटात भगवान हनुमानाच्या भूमिकेत झळकणार

Sunny Deol: ‘गदर 2’च्या यशानंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली ताकद सिद्ध करणारा बॉलिवूड अभिनेता सनी देओलबाबत अपडेट समोर येत आहे. एकामागून एक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये तो झळकत असतानाच आता त्याला ‘रामायण’ विश्वातील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट मिळाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या आगामी पौराणिक संगीतमय चित्रपटात सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा भगवान हनुमानावर आधारित स्वतंत्र संगीतमय चित्रपटाची तयारी करत आहेत. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या भव्य प्रोजेक्टसाठी सनी देओल हा निर्मात्यांचा पहिला आणि प्रमुख पर्याय आहे. त्यांच्या मते, हनुमानाच्या शक्ती, भावनिक खोली आणि आक्रमकतेसाठी सनी देओलपेक्षा योग्य अभिनेता सध्या दुसरा कोणी नाही.

हनुमानाला स्वतंत्र व्यासपीठ देण्याचा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणातील हनुमानाच्या दृश्यांची सुरुवातीची संकल्पना पाहिल्यानंतर निर्मात्यांना हे पात्र स्वतंत्र चित्रपटासाठी अधिक सक्षम असल्याचे जाणवले. रामायणाच्या कथेत हनुमानाचे योगदान इतके प्रभावी आहे की त्याला स्वतंत्र व्यासपीठ देणे गरजेचे वाटले. ही भूमिका साकारण्यासाठी सनी देओल यांचे नाव वारंवार पुढे येत होते, कारण ते आधीच रामायण विश्वाचा भाग आहेत.  

हेही वाचा – Zubeen Garg Death: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; 4 जणांवर खळबळजनक आरोप, SIT कडून आरोपपत्र दाखल

अ‍ॅक्शन, संगीत आणि भव्यतेचा संगम

हा चित्रपट केवळ पौराणिक न राहता पौराणिक-पॉप ऑपेरा स्वरूपाचा असणार आहे. निर्मात्यांचा उद्देश अ‍ॅव्हेंजर्ससारखी परस्पर जोडलेली सिनेमॅटिक दुनिया उभारण्याचा आहे. यामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन सीन, भव्य हवाई युद्धे आणि सुमारे 12 मिनिटांचे महाकाय युद्धगीत यांचा समावेश असणार आहे. कथा, पात्रे आणि क्रॉसओव्हर्स एकमेकांशी जोडलेले असतील, अशीही माहिती समोर येत आहे. सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले, तर पुढील वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Sonakshi Sinha Viral Video: सोनाक्षी-जहीरमध्ये कडाक्याचं भांडण, घराबाहेर राहिली अभिनेत्री; गोंधळ ऐकून शेजारीही बाहेर आले अन्

सनी देओलचा आगामी प्रवास

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सनी देओल नुकताच ‘जाट’ चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच ‘बॉर्डर 2’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट 22 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘लाहोर 1947’, ‘जाट 2’, ‘इक्का’ आणि ‘रामायण’ असे अनेक मोठे चित्रपट आहेत. एकूणच, पौराणिक विश्वात सनी देओलची ही नवी भूमिका प्रेक्षकांसाठी मोठे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number