Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुधाच्या दरवाढीची झळ बसणार आहे. ‘अमूल’ने दरवाढ जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच ‘मदर डेअरी’ने देखील आपल्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर 14 मे पासून लागू होणार असून, यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या मासिक बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च आणि दुधाच्या खरेदी किमतीत झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
अमूलच्या सर्वच ब्रँड्सच्या किमतीत वाढ
‘अमूल’ ब्रँडचे संचालन करणाऱ्या ‘गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ने (GCMMF) बुधवारी देशभरात दरवाढ लागू केली. ही दरवाढ अमूल ताजा, अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल टी स्पेशल यांसारख्या सर्व प्रमुख प्रकारांना लागू असेल. मे 2025 नंतर करण्यात आलेली ही पहिलीच दरवाढ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. चारा, पॅकेजिंग आणि इंधनाच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ या निर्णयामागे असल्याचे फेडरेशनने सांगितले.
Mother Dairy revises the consumer prices of its liquid milk variants by Rs. 2 per litre, effective May 14, 2026 pic.twitter.com/EDF7dRr6vd — ANI (@ANI) May 13, 2026
असे असतील दुधाचे नवीन दर
दरवाढीनंतर अमूलच्या विविध उत्पादनांच्या किमती खालीलप्रमाणे बदलल्या आहेत:
अमूल ताझा (1 लिटर): 55 वरून आता 57 रुपये
अमूल गोल्ड (500 मिली): 34 वरून आता 35 रुपये
अमूल शक्ती (500 मिली): 31 वरून आता 32 रुपये
अमूल काऊ मिल्क (500 मिली): 29 वरून आता 30 रुपये
अमूल म्हशीचे दूध (500 मिली): 37 वरून आता 39 रुपये
अमूल टी स्पेशल (1 लिटर): 63 वरून आता 66 रुपये
हेही वाचा – Amul Milk Price Hike: ग्राहकांना दरवाढीचा पहिला धक्का! अमूल दुधाच्या दरात वाढ, चहा-कॉफी महागणार?
उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढ अटळ
कंपन्यांच्या मते, ही दरवाढ सरासरी 2.5 टक्के ते 3.5 टक्केच्या दरम्यान आहे, जी सध्याच्या अन्नधान्य महागाई दरापेक्षा कमी आहे. मात्र, गेल्या वर्षभरात जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि परिचालन खर्चात झालेली वाढ यामुळे दुध उत्पादक संघांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. अमूलच्या या निर्णयाचे अनुकरण करत मदर डेअरीनेही दरवाढ केल्याने आता इतर स्थानिक दुग्ध कंपन्या देखील दर वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.