Amravati Crime: अमरावती हादरली! 50 वर्षीय गतिमंद महिलेवर 25 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईने आरोपीला रंगेहाथ पकडलं अन्…

एका 25 वर्षीय तरुणाने 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime: अमरावती हादरली! 50 वर्षीय गतिमंद महिलेवर 25 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईने आरोपीला रंगेहाथ पकडलं अन्…

Amravati Crime:  अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने 50 वर्षीय गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपीला रंगेहाथ पकडले; आईच्या सतर्कतेमुळे पितळ उघड
मिळालेल्या माहितीनुसार, सारंग सदावते (वय 25) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही 50 वर्षांची असून ती गतिमंद आहे. आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या आईने ऐनवेळी तिथे पोहोचून आरोपीला रंगेहाथ पकडले. आईच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार सर्वांसमोर आला.  

हेही वाचा – NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात दुसरी सूत्रधार अटकेत; NTA कडून ‘तज्ज्ञ’ म्हणून नियुक्त महिला व्याख्यातीच निघाली मास्टरमाईंड

पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी सारंग सदावते विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गतिमंद महिलेसोबत घडलेल्या या लाजिरवाण्या कृत्यामुळे महिला सुरक्षा आणि सामाजिक मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

परिसरात संतापाची लाट
चांदूर बाजारमधील या घटनेचे पडसाद उमटत असून स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका तरुणाने आपल्या आईच्या वयाच्या आणि त्यातही शारीरिक-मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलेसोबत असे कृत्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  
  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number