‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा’; अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून देश सोडण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले आहे.

‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा’; अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
Edited Image

नवी दिल्ली: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. पंतप्रधान मोदींनी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी आपत्कालीन बैठक घेतली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून देश सोडण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले आहे. शाह यांनी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना त्यांच्या संबंधित राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यास आणि त्यांना भारतातून पाकिस्तानात परत पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या दीर्घ बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय – 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार सतत अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. हल्ल्यानंतर भारताने उचललेले पहिले कठोर पाऊल म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करणे. भारताने पाकिस्तानला औपचारिक पत्र लिहून हा करार रद्द केल्याची माहिती दिली. भारताने करारात सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारला करारात सुधारणा करण्याची सूचना दिली आहे. या सूचनेत नमूद केले आहे की, कराराचे अनेक मूलभूत पैलू बदलले आहेत आणि त्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास; दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले भारतात

भारताने आपल्या पत्रात म्हटले आहे की, करारात नमूद केलेले लोकसंख्या बदल, स्वच्छ ऊर्जेचा विकास आणि पाणी वितरणाशी संबंधित विविध घटक बदलले आहेत. भारताने म्हटले आहे की, कोणताही करार चांगल्या श्रद्धेने अंमलात आणला पाहिजे, परंतु पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. भारताने पाकिस्तान सरकारला 1960 च्या सिंधू पाणी कराराच्या कलम बारा (3) अंतर्गत सुधारणा करण्याची नोटीस पाठवली आहे. 

हेही वाचा – मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आसिफ शेखचे घर उद्ध्वस्त; तर आदिलच्या घरावर बुलडोझर

पहलगाम दहशतवादी हल्ला – 

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानावर दहशतवाद्यांनी 26 जणांना गोळ्या घालून ठार केले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून लोक पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्याची मागणी करत आहेत.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number