Ambulance Ran Out of Oxygen: रुग्णवाहिकेचा हलगर्जीपणा! रुग्णालयात नेत असताना एका दिवसाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथून जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात नेत असताना अवघ्या एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला.

Ambulance Ran Out of Oxygen: रुग्णवाहिकेचा हलगर्जीपणा! रुग्णालयात नेत असताना एका दिवसाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Ambulance Ran Out of Oxygen: राजस्थानमध्ये आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथून जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात नेत असताना अवघ्या एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला बयाना येथील रुग्णालयातून जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी बाळाचे वडील आणि काका खाजगी रुग्णवाहिकेतून बाळाला घेऊन निघाले होते. मात्र, जयपूरजवळील बस्सी परिसरात रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर संपल्याचे लक्षात आले.

हेही वाचा – Anmol Bishnoi Custody : गँगस्टर अनमोल बिश्नोईचा ताबा कोणत्या एजन्सीला मिळणार?; गृह मंत्रालयाचा निर्णय आला समोर

बस्सी पोलीस ठाण्याचे अधिकारी धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन संपल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने वाहन थेट बस्सी सरकारी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेत कोणताही नर्सिंग स्टाफ उपस्थित नव्हता आणि बाळाच्या वडिलांनाच ऑक्सिजन सिलिंडर हाताळावा लागत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – Lionel Messi Event : कोलकत्यातील मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर संयोजकाविरोधात मोठी कारवाई, जाणून घ्या

दरम्यान, या घटनेनंतर बाळाचा मृतदेह कुटुंबीयांनी पुन्हा भरतपूरला नेला. भरतपूरमध्ये पोहोचताच संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात निदर्शने केली. ‘आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बाळाचा जीव गेला,’ असा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, घटनेमुळे राज्यातील आरोग्य सुविधा, खासगी रुग्णवाहिकांची जबाबदारी आणि आपत्कालीन सेवांतील त्रुटी यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number