Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीला आवळ्याच्या पूजेने मिळेल श्रीहरीचा आशीर्वाद; जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि व्रताचे महत्त्व

आमलकी एकादशीच्या व्रतामुळे भगवंताकडून समृद्धीचे वरदान मिळते. यावर्षीच्या आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधीची सविस्तर माहिती घेऊ..

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीला आवळ्याच्या पूजेने मिळेल श्रीहरीचा आशीर्वाद; जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि व्रताचे महत्त्व

Amalaki Ekadashi 2026 : हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात येणारी 'आमलकी एकादशी' श्रीविष्णूंच्या भक्तांसाठी विशेष पर्वणी आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून, या व्रतामुळे भक्तांना सुख, समृद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

आमलकी एकादशीची तिथी आणि मुहूर्त
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीची सुरुवात आणि सांगता खालीलप्रमाणे होईल:
– एकादशी तिथी प्रारंभ: 26 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 12:33 वाजता.
– एकादशी तिथी समाप्ती: 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:32 वाजता.
– व्रताचा मुख्य दिवस: उदयतिथीनुसार, आमलकी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल.
– पूजेचा शुभ मुहूर्त: आवळ्याच्या झाडाच्या पूजेसाठी सकाळी 6:48 ते 11:08 पर्यंतची वेळ अत्यंत शुभ आहे.
– व्रत पारणे (उपवास सोडण्याची वेळ): 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6:48 ते 9:05 या वेळेत उपवास सोडावा.

हेही वाचा – Holi 2026: होळीला 4 ग्रहांची 'उलटी चाल'! राहु-केतूसह गुरु-बुध होणार वक्री; 'या' 3 राशींना धनलाभाची मोठी संधी

दुर्मिळ शुभ योगांचा मिलाफ
यावर्षीची आमलकी एकादशी अनेक शुभ योगांमुळे अधिक प्रभावशाली ठरली आहे. या दिवशी खालील 4 महत्त्वाचे योग जुळून येत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, आयुष्मान योग, सौभाग्य योग असे योग या दिवशी आहेत. शास्त्रानुसार, अशा शुभ योगांमध्ये केलेली पूजा आणि दानधर्म केल्यास त्याचे फळ दुप्पट मिळते.

आवळ्याच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व
विष्णू पुराणानुसार, आवळ्याचे झाड हे भगवान विष्णूंच्या अश्रूंपासून उत्पन्न झाले आहे, असे मानले जाते. या वृक्षात सर्व देवी-देवतांचा वास असतो. म्हणूनच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी केवळ आवळ्याचे सेवन करणेच नव्हे, तर आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा घालणे देखील पुण्यकारक मानले जाते.

व्रताचे लाभ आणि फळ
आमलकी एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांसाठी शास्त्रात अनेक लाभ सांगितले आहेत. मोक्ष प्राप्ती हा या व्रताचा सर्वात मोठा लाभ आहे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. हे व्रत करण्यामुळे समस्यांचेही निवारण होते. घरातील आर्थिक अडचण (कर्ज), मानसिक ताण आणि आरोग्याच्या जुन्या समस्या या व्रताच्या प्रभावाने हळूहळू दूर होतात. सुख-शांती-समृद्धी नांदते. कारण, या व्रतामुळे भगवान नारायणासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख आणि ऐश्वर्याचे आगमन होते.

हेही वाचा – Chandra Grahan and Holi : 100 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! होळीच्या दिवशी 'ब्लड मून'चं दर्शन; जाणून घ्या भारतात दिसण्याची वेळ, सूतक काळ 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number