Crime News : आधीच विवाहबाह्य संबंध त्यात घडला गुन्हा; ‘या’ इसमाने गर्लफ्रेंडला घरी बोलवून जे केलं, त्याने भल्याभल्यांचं डोकं चक्रावलं

नौदलात कार्यरत असलेल्या एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याने आपल्या 29 वर्षीय प्रेयसीला संपवून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले.

Crime News : आधीच विवाहबाह्य संबंध त्यात घडला गुन्हा; ‘या’ इसमाने गर्लफ्रेंडला घरी बोलवून जे केलं, त्याने भल्याभल्यांचं डोकं चक्रावलं

Crime News: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील गजुवाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'एलव्ही नगर' भागात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नौदलात कार्यरत असलेल्या एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याने आपल्या 29 वर्षीय प्रेयसीला संपवून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. या नराधम आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर हा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे.

पत्नीच्या अनुपस्थितीत प्रेयसीला बोलावले घरी
मृत महिलेची ओळख मोनिका (वय 29) अशी पटली आहे. आरोपी सी.एच. रविंद्र हा नौदलात तंत्रज्ञ (Technician) म्हणून कार्यरत असून तो मुळचा विजयनगरम जिल्ह्यातील आहे. रविंद्र विवाहित असूनही त्याचे मोनिकासोबत प्रेमसंबंध होते. काही आठवड्यांपूर्वीच रविंद्रची पत्नी आपल्या माहेरी गेली होती, त्यामुळे तो घरी एकटाच होता. याच संधीचा फायदा घेऊन रविवारी दुपारी त्याने मोनिकाला आपल्या घरी बोलावले. काही तास एकत्र घालवल्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात रविंद्रने चाकूने वार करून मोनिकाचा जीव घेतला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा क्रूर प्रयत्न
हत्या केल्यानंतर रविंद्रने अत्यंत क्रूरपणे मोनिकाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. त्याने शरीराचे काही भाग एका पिशवीत भरून निर्मनुष्य ठिकाणी फेकून दिले, तर उर्वरित भाग पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रिज) लपवून ठेवले. मात्र, त्यानंतर पश्चात्ताप झाल्याने किंवा भीतीपोटी त्याने स्वतःहून पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने त्याच्या घरी धाव घेत फ्रिजमधून मृतदेहाचे अवशेष जप्त केले आहेत.

हेही वाचा – Congress President Killed: काँग्रेस नेत्यावर कुऱ्हाडीने सपासप वार; अध्यक्षाला डोक्यावर वार करून संपवलं, नेमकं प्रकरण काय?

'शीर' अद्याप बेपत्ता; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रच्या घरातून मृतदेहाचे अनेक भाग सापडले असले तरी मोनिकाचे 'शीर' (डोके) अद्याप मिळालेले नाही. आरोपीने ते अन्य कुठल्यातरी गुप्त ठिकाणी फेकून दिले असावे, असा पोलिसांना संशय आहे. मृतदेहाचे उर्वरित भाग आणि शीर शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तैनात केले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तांत्रिक तपास करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number