Alpha Official Trailer Out : आलिया – शर्वरीचा खतरनाक अवतार; बॉली देओल – अनिल कपूरची तगडी साथ, हृतिक रोशनची झलक?, ‘अल्फा’चा ट्रेलर रिलीज

यश राज फिल्म्सने ‘अल्फा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या आणि शर्वरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. दोन खतरनाक तरुणींची एक रंजक आणि मजेशीर ‘ओरिजिन स्टोरी’ मांडणारा एक जबरदस्त ॲक्शन-एंटरटेनर म्हणून अल्फा चित्रपट समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेची अधिक झलक पाहायला मिळते. तो आलिया भट्टचा एक […]

Alpha Official Trailer Out : आलिया – शर्वरीचा खतरनाक अवतार; बॉली देओल – अनिल कपूरची तगडी साथ, हृतिक रोशनची झलक?, ‘अल्फा’चा ट्रेलर रिलीज

यश राज फिल्म्सने ‘अल्फा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या आणि शर्वरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. दोन खतरनाक तरुणींची एक रंजक आणि मजेशीर ‘ओरिजिन स्टोरी’ मांडणारा एक जबरदस्त ॲक्शन-एंटरटेनर म्हणून अल्फा चित्रपट समोर आला आहे. या ट्रेलरमध्ये बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेची अधिक झलक पाहायला मिळते. तो आलिया भट्टचा एक कठोर मार्गदर्शक आहे. तसेच, यात अनिल कपूर यांचीही झलक दिसते. ज्यांचा संबंध ‘अल्फा प्रोग्राम’शी असल्याचे संकेत मिळतात. तसेच ट्रेलरच्या शेवटी घाऱ्या डोळ्यांचा कलाकार पाहायला मिळतो, त्यामुळे चित्रपटात हृतिक रोशनचीही भूमिका पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : Alia’s Alpha Film Teaser : आलियाचा ‘अल्फा’ फ्रेंच थ्रिलर ‘ला फेम निकिता’ची नक्कल? नेटकऱ्यांनी शोधले दृष्यांमधील साम्य; व्हिडीओ व्हायरल

दमदार ॲक्शन आणि आकर्षक दृश्यांनी नटलेला, तसेच अत्यंत मनोरंजक व रोमांचक अनुभवाचे आश्वासन देणारा ‘अल्फा’ हा चित्रपट आलिया आणि शर्वरी या दोन तरुणींच्या निर्भय ‘अल्फा’ वृत्तीचा गौरव करणारा एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट म्हणून स्वतःला सादर करतो.
चित्रपटात शर्वरीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने ट्रेलरमध्ये तिच्या पात्राचा प्रवास मुद्दाम गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, बॉबी देओलला कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी ती आलियासोबत हातमिळवणी करत असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.

अल्फाच्या स्टाईलिश, आकर्षक व्हिज्युअल्सना अधिकच उठाव देणारे आहे त्याचे स्पंदनशील पार्श्वसंगीत. जागतिक टॉप डीजे ह्युगेलचे जगभर गाजलेले ‘जमैकन बॅम बॅम’ हे गाणे ट्रेलरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जेणेकरून ट्रेलरमध्ये ऊर्जेचा एक अविरत स्फोट घडून येईल. हे त्या ॲड्रेनालाईन रशचे प्रतीक आहे, जो ‘अल्फा’ चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहताना लोकांमध्ये निर्माण करू इच्छितो.
शिव रावेल दिग्दर्शित हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी जगभरात केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number