मणिपूर हिंसाचारसंदर्भात आज अमित शाहाच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री शिंदे हजर राहणार आहेत. तर शरद पवारांचीपूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे अनुपस्थिती असणार आहे. संसद पुस्तकालंय भवन नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. दुपारी ३ वाजता या बैठकीला सुरवात होईल. मणिपूर येथील परिस्थिती बाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी पुन्हा एकदा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. लष्करही प्रत्युत्तर देत आहे. भारतीय लष्कराच्या स्पिअर कॉसने ही माहिती दिली. महिला आंदोलकांचा मोठा गट या भागात अतिरिक्त सैन्याच्या हालचालीत अडथळा आणत आहे. सशस्त्र हल्लेखोरांना रोखण्यासाठी लष्कराने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ नाकेबंदी केली आहे.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी शुक्रवारी अनेक जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरूच होती. सुरक्षा दलांच्या संयुक्त शोध मोहिमेत आतापर्यंत एकूण १०९५ शस्त्रे, १३७०२ दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.