Videep Jadhav Funeral : अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; चिमुरड्याला मुखाग्नी देताना पाहून उपस्थितांना अश्रू अनावर

&quotदादांसोबत सावलीसारखे राहू&quot हा शब्द जणू त्यांनी शेवटच्या क्षणीही पाळला. आज सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.<br/>

Videep Jadhav Funeral : अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; चिमुरड्याला मुखाग्नी देताना पाहून उपस्थितांना अश्रू अनावर

Videep Jadhav Funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला आहेच, पण याच दुर्घटनेत दादांची सावली बनून राहणारे त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव यांचाही अंत झाला. “दादांसोबत सावलीसारखे राहू” हा शब्द जणू त्यांनी शेवटच्या क्षणीही पाळला. आज सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अखेरचा निरोप; चिमुकल्या हातांनी दिला मुखाग्नी
विदीप जाधव यांचा पार्थिव देह जेव्हा त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे आणण्यात आला, तेव्हा संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेत गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. विदीप यांच्या 9 वर्षांच्या मुलाने जेव्हा आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा संयम सुटला आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

कर्तव्यासाठी वाहिलेलं आयुष्य
विदीप जाधव हे केवळ एक पोलीस कर्मचारी नव्हते, तर ते निष्ठेचे प्रतीक होते. 2009 च्या बॅचचे कर्मचारी असलेले जाधव गेल्या चार वर्षांपासून अजित पवारांच्या सुरक्षा ताफ्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. शिस्तप्रिय पण तितकेच मनमिळाऊ अशी त्यांची ओळख होती. मुंबई असो वा सातारा, आपल्या कामाप्रती असलेली त्यांची तत्परता नेहमीच कौतुकाचा विषय ठरली. गेल्या 27 वर्षांपासून ठाण्यातील विटावा (कळवा) येथे स्थायिक असलेल्या विदीप यांच्या पश्चात पत्नी, 14 वर्षांची मुलगी, 9 वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

हेही वाचा – Ajit Pawar Funeral: भावाच्या निधनाने सुप्रियाताईंचा काळजाचा तुकडा हरपला; स्वतः सावरत सुनेत्रा वहिनी आणि भाच्यांसाठी बनल्या ‘ढाल’

तरडगावचा अभिमान अन् मोठी पोकळी
जाधव यांच्या निधनाने पोलीस दलाने एक निष्ठावान अधिकारी गमावला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “विदीप जाधव यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांमुळेच पोलीस दलाची प्रतिमा उंचावते.” तरडगावच्या मातीतील हा सुपुत्र आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा करत असताना शहीद झाला, अशीच भावना ग्रामस्थांमध्ये आहे. अजितदादांची सुरक्षा करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या ‘कर्तव्यदक्ष सावली’ला संपूर्ण महाराष्ट्राने सलाम केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number