Ajit Pawar’s Convoy Accident: अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; दुचाकीवर असलेले कुटुंबीय गंभीर जखमी

धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

Ajit Pawar’s Convoy Accident: अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; दुचाकीवर असलेले कुटुंबीय गंभीर जखमी

Ajit Pawar’s Convoy Accident: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक अपघात घडला. धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. अजित पवार हे मराठवाड्यातील दौऱ्यावर असताना माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी थांबले होते. नियोजित कार्यक्रमात नसतानाही त्यांनी अचानक भेट देऊन निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, समोरच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ती स्लीप झाली. या दुचाकीवर पती-पत्नी व त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश होता. अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही लहान मुलांनाही मार लागला असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Accidental Deaths In India: देशातील आकस्मिक मृत्यूच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; NCRB च्या अहवालात धक्कादायक खुलासा

तथापी, अपघातात गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय, अपघातग्रस्त अग्निशामक वाहनातील दोन कर्मचाऱ्यांनाही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – Ambarnath Overbridge Accident: अंबरनाथमध्ये शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात; चार जणांचा मृत्यू

दरम्यान, अपघाताबाबत धारूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. वाहनाच्या वेग, रस्त्याची परिस्थिती आणि चालकाची निष्काळजीपणा या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. अजित पवारांच्या ताफ्यात घडलेल्या या अपघातामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number