Air India चा प्रवास महागणार! 8 एप्रिलपासून विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

जागतिक स्तरावर जेट इंधनाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. 8 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून हे नवीन वाढीव दर लागू होतील.

Air India चा प्रवास महागणार! 8 एप्रिलपासून विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Air India Ticket Price Hike due to Fuel Surcharge : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने विमान इंधनावरील अधिभार (Surcharge) वाढवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. 8 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून हे नवीन वाढीव दर लागू होतील. वृत्तानुसार, जागतिक स्तरावर जेट इंधनाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. विशेषतः बांगलादेश, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय मार्गांसह देशांतर्गत विमान प्रवासावरही याचा मोठा परिणाम होणार आहे.

अंतरावर आधारित नवी दरवाढ
एअर इंडियाने आता 'एकसमान दर पद्धत' रद्द करून अंतराप्रमाणे नवीन अधिभार रचना लागू केली आहे. देशांतर्गत प्रवासासाठी खालीलप्रमाणे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल:
0 ते 500 किमी प्रवासासाठी: 299 रुपये.
501 ते 1,000 किमी प्रवासासाठी: 399 रुपये.
1,001 ते 1,500 किमी प्रवासासाठी: 549 रुपये.
1,501 ते 2,000 किमी प्रवासासाठी: 749 रुपये.
2,000 किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी: 899 रुपये.

हेही वाचा – Sea Plane Trial: उत्तराखंडच्या पर्यटनाला मिळणार गती; पशूलोक बॅरेजवर सी-प्लेनचे पाण्यात यशस्वी लँडिंग, पाहा व्हिडीओ

इंधन दरवाढीचा विमान प्रवासाला फटका
विमान इंधनाच्या (ATF) जागतिक किमतींमध्ये झालेली वाढ धक्कादायक आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस 99.40 रुपये प्रति बॅरल असलेले जेट इंधन 27 मार्च 2026 पर्यंत थेट 195.19 रुपये प्रति बॅरलवर पोहोचले आहे. ही जवळपास 100 टक्के वाढ असून कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रिफायनरी मार्जिनमधील वाढ यामुळे हे संकट ओढवले आहे. सरकारने इंधन किमतींमधील वाढीवर 25 टक्क्यांची मर्यादा घातलेली असली, तरी वाढता खर्च भरून काढण्यासाठी एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम
केवळ भारतातील शहरेच नव्हे, तर परदेशात जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांवरही इंधन अधिभार वाढवण्यात आला आहे. एअर इंडियाने दिलेल्या संकेतांनुसार, आंतरराष्ट्रीय मार्गांवरील तिकीट दरांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे 8 एप्रिलनंतर विमान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांना आणि व्यावसायिक प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या इंधन खर्चामुळे विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत असल्याने हा दरवाढीचा भार प्रवाशांवर टाकण्यात आला आहे.

हेही वाचा – LPG and PNG Price : गॅस सिलिंडर करमुक्त होणार? घरगुती LPG आणि PNG 'टॅक्स फ्री' झाल्यास किती पैसे वाचतील, जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number