..अन् त्याने चक्क झोपेत कमवले लाखो रूपये… डोळे उघडताच विश्वास बसेना, नेमकं काय घडलं?

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाने जगातील अनेक क्षेत्रे व्यापली असून आता शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्येही या तंत्रज्ञानाचा करिश्मा पाहायला मिळत आहे.

..अन् त्याने चक्क झोपेत कमवले लाखो रूपये… डोळे उघडताच विश्वास बसेना, नेमकं काय घडलं?

AI Trading Bot Earns 43800 Dollars Overnight : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाने जगातील अनेक क्षेत्रे व्यापली असून आता शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्येही या तंत्रज्ञानाचा करिश्मा पाहायला मिळत आहे. एका ट्रेडिंग बॉटने अवघ्या काही तासांत 11 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 40 लाख रुपयांचा नफा मिळवून दिल्याची घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ट्रेडरने अर्धवट झोपेत दिलेली एक 'मंजुरी' त्याला काही तासांतच करोडपती होण्याच्या वाटेवर घेऊन गेली आहे.

पहाटे 3:47 चा तो 'अलर्ट' आणि मोठा नफा
एका ट्रेडरने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या OpenCaw नावाच्या एआय एजंटने त्याला पहाटे 3:47 च्या सुमारास एक अलर्ट पाठवला. या बॉटने प्रेडिक्शन मार्केटमध्ये 12,000 डॉलर्स (सुमारे 11 लाख रुपये) गुंतवण्याची मोठी संधी असल्याचे सुचवले. ट्रेडरने अर्धवट झोपेतच या ट्रेडला परवानगी दिली आणि तो पुन्हा झोपी गेला. सकाळी जेव्हा तो जागा झाला, तेव्हा त्याच्या खात्यात 43,800 डॉलर्स (सुमारे 40 लाख रुपये) जमा झाले होते. म्हणजेच या ट्रेडिंग बॉटने केवळ काही तासांत 300 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला.

डेटा संकलन आणि 'टाइम-झोन आर्बिट्राज'
हा एआय बॉट केवळ बातम्या वाचत नाही, तर तो जगातील विविध डेटा सोर्सेसवर सतत लक्ष ठेवून असतो. यामध्ये जपान सरकारची फीड, युरोपियन संसदेचे लाइव्ह स्ट्रीम, ऑस्ट्रेलियातील आर्थिक बातम्या, फ्लाईट ट्रॅकिंग डेटा आणि आशियाई मध्यवर्ती बँकांच्या घोषणांचा समावेश असतो. तांत्रिक भाषेत याला 'टाइम-झोन आर्बिट्राज' म्हणतात. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली घटना मार्केटमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी जो थोडा वेळ लागतो, त्या वेळेचा फायदा एआय घेते. मानवी मेंदूला अशक्य असलेल्या वेगाने माहिती वाचून मार्केट अपडेट होण्यापूर्वीच एआय आपले काम फत्ते करते.

हेही वाचा – Auto Driver Mother : 21 व्या शतकातली हिरकणी! तीन वर्षाच्या लेकीला घेऊन ती माय चालवते रिक्षा, हृदयस्पर्शी व्हिडीओने तुमचेही डोळे पाणावतील

पॉलीमार्केट आणि स्वयंचलित प्रणाली
हा विशिष्ट एआय एजंट 'पॉलीमार्केट' (Polymarket) सारख्या प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्मसाठी विकसित करण्यात आला होता. हे सॉफ्टवेअर इंटरनेटवरील बातम्या, सरकारी घोषणा आणि सोशल मीडियावरील हालचालींचे सतत स्कॅनिंग करते. जेव्हा एखाद्या जागतिक घटनेमुळे मार्केटमध्ये बदल होणार हे निश्चित होते, तेव्हा बॉट त्वरित स्वस्त किमतीत पोझिशन्स खरेदी करतो आणि किंमत वाढताच नफा कमवून ट्रेड बंद करतो. विशेषतः क्रिप्टो मार्केटमध्ये 5 ते 15 मिनिटांच्या शॉर्ट टर्म ट्रेड्ससाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत आहे.

ट्रेडिंगचे भविष्य आणि एआयचा प्रभाव
या घटनेने ट्रेडिंग विश्वात एकच खळबळ उडवून दिली आहे. एआय ट्रेडिंग बॉट्स मानवी हस्तक्षेपाशिवाय तासाला शेकडो ट्रेड्स करू शकतात, ज्यामुळे नफ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. जिथे सामान्य ट्रेडरला निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो, तिथे एआय सेकंदाच्या हजाराव्या भागात कृती करते. मात्र, अशा प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये धोकेही तितकेच असतात, त्यामुळे तांत्रिक जाणकारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. सध्या इंटरनेटवर या 'स्मार्ट' गुंतवणुकीची आणि त्यातून मिळालेल्या बंपर नफ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – How To Check QR Code: क्यूआर कोड स्कॅन करताना खरा आहे की खोटा हे कसं ओळखायचं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number