Don 3: ‘धुरंधर’च्या यशानंतर ‘डॉन 3’ मधून रणवीर सिंगची ‘एक्झिट’; आता ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर रणवीरने आपल्या आगामी वाटचालीची रणनीती बदलली असल्याचे बोलले जात आहे.<br/>

Don 3: ‘धुरंधर’च्या यशानंतर ‘डॉन 3’ मधून रणवीर सिंगची ‘एक्झिट’; आता ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Don 3: बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग याने त्याच्या करिअरबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या 'डॉन 3' चित्रपटासाठी चाहते उत्सुक होते, त्या प्रोजेक्टमधून रणवीर आता बाहेर पडला आहे. 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर रणवीरने आपल्या आगामी वाटचालीची रणनीती बदलली असल्याचे बोलले जात आहे.

का सोडला 'डॉन 3'?

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, 'धुरंधर'मध्ये गँगस्टरची भूमिका साकारल्यानंतर रणवीरला पुन्हा लगेच त्याच धाटणीचा चित्रपट करायचा नाहीये. फरहान अख्तरचा 'डॉन 3' वारंवार पुढे ढकलला जात असल्याने रणवीरने आपली प्राथमिकता बदलली आहे. त्याला आता संजय लीला भन्साळी, लोकेश कनागराज आणि अ‍ॅटली यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत वेगळ्या विषयांवर काम करायचे आहे.

हेही वाचा – Kapil Sharma Show Controversy: कपिल शर्माचा शो कायद्याच्या कचाट्यात! मुंबई हायकोर्टात खटला दाखल; कारण काय?

आता कोणत्या चित्रपटावर लक्ष?

'डॉन 3' ला रामराम ठोकल्यानंतर रणवीरने आता जय मेहता यांच्या 'प्रलय' या चित्रपटाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रणवीर वैयक्तिकरित्या तारखांचे नियोजन करत आहे. गँगस्टर इमेजमधून बाहेर पडून प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन आणण्यासाठी तो सध्या प्रचंड उत्सुक आहे.

हेही वाचा – Jay Dudhane Engagement: 'बिग बॉस' फेम जय दुधाणेने उरकला साखरपुडा; मसुरीतील रोमँटिक प्रपोजलनंतर आता बांधणार लग्नगाठ

फरहान अख्तरसमोर नवे आव्हान

रणवीर सिंगने माघार घेतल्यामुळे दिग्दर्शक फरहान अख्तरसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जानेवारी 2026 च्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचे नियोजन होते. आता निर्मात्यांना नवीन 'डॉन'चा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून कृती सॅनन हिचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे, तरीही अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number