Kranti Redkar : ‘पाकिस्तानातून धमक्या.. काम मिळणंही झालंय कठीण’; समीर वानखेडेंच्या पत्नीचा खळबळजनक दावा

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा लेक आर्यन खान याच्या वेब सीरीजविरोधात मानहानीचा दावा केला. आता वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पाकिस्तानातून धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे.

Kranti Redkar : ‘पाकिस्तानातून धमक्या.. काम मिळणंही झालंय कठीण’; समीर वानखेडेंच्या पत्नीचा खळबळजनक दावा

Kranti Redkar's Claim : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजनंतर शाहरुख खान आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणावर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

'धमक्या येत आहेत, पाकिस्तानातूनही मेसेज'
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना क्रांती रेडकर यांनी पती समीर वानखेडे यांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली.
धमक्या आणि ट्रोलिंग: त्या म्हणाल्या, "आम्हाला धमक्या येत आहेत. यामध्ये पाकिस्तानातूनही मेसेज येत आहेत. आम्ही हे सर्व याचिकेमध्ये नमूद केले आहे. आम्हाला सतत ट्रोल केले जात आहे, पण जनता मूर्ख नाही."
आमची सत्याची बाजू: "ज्या लोकांनी समीरचे काम पाहिले आहे आणि ज्या लोकांना कायदा कळतो, ते नेहमीच आमच्या बाजूने उभे आहेत. आमच्याकडे काही कोट्यवधी रुपये पडलेले नाहीत. आमच्याकडे केवळ सत्याची बाजू आहे आणि ती आम्ही मांडत राहणार," असेही क्रांती यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Defamation Case : आर्यन खानविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले,…

'आत्मसन्मानासाठी लढाई'; पतीला पाठिंबा
समीर वानखेडे यांनी मानहानीचा दावा दाखल करण्यामागची भूमिका क्रांती यांनी स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे अनेक घडामोडी आणि आरोपांचा सामना करत आहेत. मात्र, आमची लढाई स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची आहे. "ते (समीर वानखेडे) छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानतात. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला तर त्यांना ते सहनच होणार नाही. आत्मसन्मासाठी त्यांनी हा लढा पुकारला आहे. त्यांचे हे पाऊल अजिबात चुकीचे नाही आणि मी पत्नी म्हणून त्यांच्या कायम सोबत आहे."

'हिंदी इंडस्ट्रीत काम मिळणे झाले कठीण'
या संपूर्ण प्रकरणामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि कामावर झालेल्या परिणामांबद्दल क्रांती रेडकर यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, "सध्याच्या प्रकारानंतर मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे कठीण झाले आहे." मात्र, त्यांना याची खंत वाटत नाही. "कारण लढाई लढताना काहीतरी गमवावे लागतेच. मला मराठी इंडस्ट्रीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र, हिंदीमध्ये काम मिळवणे कठीण झाले आहे," अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.

हेही वाचा – Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टात मोठा धक्का! आर्यन खानच्या वेब सीरिजविरोधात मानहानी प्रकरणाची सुनावणी.. कोर्ट म्हणाले,

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number