मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन ‘बिग बॉस सीझन 16’ च्या रविवारच्या एका खास भागाचे सुत्रसंचालन करताना दिसले. त्यामुळे ते बरेच चर्चेत होते. अशातच पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्या एका खास पोस्टमुळे. शेखर सुमन यांनी आपल्या पत्नीला असं काही गिफ्ट दिल जे पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.
अभिनेते शेखर सुमन यांचा काल लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी आपल्या पत्नीला चक्क 2.4 कोटींची गाडी भेट म्हणून दिली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करत माहिती दिली. त्यांनी आपल्या पत्नीला बीएमडब्लू गाड़ी भेट दिली आहे.
अभिनेते शेखर सुमन यांनी लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला महागडी गाडी भेट दिली. त्याचा फोटो त्यांचा मुलगा अध्ययन सुमन याने देखील शेअर केले आहे.
या फोटोत शेखर आणि अध्ययन गाडीचे चुंबन घेताना दिसत आहेत. या फोटोला त्याने,” लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा. आई तुला बाबांकडून मिळालेल्या या स्पेशल भेटीसाठी जास्त शुभेच्छा. एक दिवस मी तुला रोल्स भेट देऊ शकेन. देवा मला त्यासाठी शक्ती आणि तुझा आशीर्वाद राहू दे”, असे कॅप्शन दिले आहे.शेखर सुमन यांचा हा फोटो पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी आणेल प्रतिक्रिया दिल्या आहेत.