Delhi University Acid Attack: दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल

ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.

Delhi University Acid Attack: दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला; आरोपीवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्ली विद्यापीठातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर रविवारी सकाळी अ‍ॅसिड हल्ला झाला आहे. ही धक्कादायक घटना लक्ष्मीबाई कॉलेजपासून काही अंतरावर घडली असून, हल्ल्यात पीडितेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – Ujjwal Nikam On Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया समोर, हातावर लिहून…

अधिकृत माहितीनुसार, पीडिता रविवारी अशोक विहार येथील लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी तिच्यावर ज्वलनशील द्रव फेकला. पीडितेने प्रसंगावधान राखत चेहरा झाकला, त्यामुळे तिचा चेहरा वाचला, मात्र तिचे हात गंभीररीत्या भाजले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस तपासात समोर आले आहे की मुख्य आरोपी जितेंद्र हा पीडितेचा परिचित असून, सुमारे महिनाभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. 

हेही वाचा – Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट; आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर पोलिसांसमोर हजर

जितेंद्रसोबत त्याचे दोन साथीदार, इशान आणि अरमान, हल्ल्याच्या वेळी उपस्थित होते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, इशानने अरमानला बाटली दिली आणि त्याने अ‍ॅसिड फेकले. सध्या पीडितेवर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी गुन्हे शाखा आणि एफएसएल टीमला बोलावून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. पीडितेच्या जबाबावरून भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number