Bribery Case: ‘एसीबी’चा एकाच दिवशी दुहेरी स्ट्राईक! जालन्यात तहसीलदार तर बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं

बीड आणि जालना एसीबीने परस्परांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.<br/>

Bribery Case: ‘एसीबी’चा एकाच दिवशी दुहेरी स्ट्राईक! जालन्यात तहसीलदार तर बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं

Bribery Case: लाचखोर प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली कारवाई तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज 'एसीबी'ने वेगवेगळ्या दोन ठिकाणी धाडसी कारवाया करत भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोठा दणका दिला. यातील पहिल्या कारवाईत एका पोलीस कर्मचाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले, तर दुसऱ्या धडाकेबाज कारवाईत थेट वर्ग-1 च्या तहसीलदारालाच 6 लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीड आणि जालना एसीबीने परस्परांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तहसीलदार विजय चव्हाण जेरबंद
मिळालेल्या माहितीनुसार, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर ही मोठी कारवाई केली. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी पोकलेन यंत्र आणि ट्रक विनाअडथळा सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात चव्हाण यांनी तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीने छत्रपती संभाजीनगर येथील तहसीलदारांच्या राहत्या घरी सापळा रचला. ही लाचेची अवजड रक्कम स्वीकारताना चव्हाण यांना रंगेहात अटक करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणाची नोंद छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून केली जात आहे.

10 हजारांची लाच घेणारा वादग्रस्त पोलीस अंमलदारही अटकेत
दुसऱ्या कारवाईत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बीडमधील नेकनूर येथे जाऊन एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. दत्तात्रय बळवंत असे अटक करण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. एका प्रकरणात मदत करण्यासाठी बळवंत यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच सापळा लावून बळवंत यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

हेही वाचा – Crime News: धक्कादायक! प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या 5 वर्षांच्या निष्पाप लेकीचा आईने काढला काटा; 'असं' फुटलं आरोपीच बिंग

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच पोलीस अंमलदाराचा एका तरुणाला 'तुझे चारित्र्य खराब करेन' अशी धमकी देणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता, ज्यामुळे ते आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अखेर लाचखोरीच्या प्रकरणात ते एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number