ICC T20 Rankings: टी20 रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर; तर सूर्यकुमार आणि इशान किशनचीही मोठी झेप

कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन यांनी रँकिंगमध्ये लक्षणीय प्रगती करत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.<br/>

ICC T20 Rankings: टी20 रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर; तर सूर्यकुमार आणि इशान किशनचीही मोठी झेप

ICC T20 Rankings : 2026 च्या आयसीसी टी20 विश्वचषकापूर्वी जाहीर झालेल्या ताज्या टी20 क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने जगातील पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाचे स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन यांनी रँकिंगमध्ये लक्षणीय प्रगती करत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे.

अभिषेक शर्मा अव्वल स्थानी कायम
अभिषेक शर्माच्या रेटिंगमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत (929 वरून 917) थोडी घसरण झाली असली, तरी तो अजूनही पहिल्या क्रमांकावर भक्कम आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या फिल साल्ट (834 रेटिंग) आणि अभिषेक यांच्यात मोठे अंतर आहे. यामुळे आगामी टी20 विश्वचषकात अभिषेक शर्मा 'नंबर वन' फलंदाज म्हणून मैदानात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर फिल साल्टने तिसरे स्थान पटकावले असून, भारताचा तिलक वर्मा सामने न खेळल्यामुळे चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

हेही वाचा – Cricket Rules Change: MCC ने क्रिकेट नियमांमध्ये केले मोठे बदल, कोणते आहेत 73 नियम, कधीपासून होणार लागू?

सूर्या आणि इशानची बहारदार कामगिरी
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या स्फोटक खेळींच्या जोरावर त्याने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असून तो आता टॉप 5 मध्ये येण्याच्या उंबरठ्यावर आहे. तसेच, इशान किशन याने या रँकिंगमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेल्या शानदार शतकामुळे इशानने थेट 32 व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या इशानसाठी हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number