PM Narendra Modi Address: ‘स्त्री सर्व काही माफ करते, पण अपमान विसरत नाही…’; महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

पंतप्रधान मोदी म्हणाले, नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेत मंजूर होऊ शकले नाही, याचे मला मनापासून दुःख आहे. आम्ही शर्थीचे प्रयत्न करूनही विरोधकांनी अडथळा आणल्यामुळे यश मिळाले नाही.

PM Narendra Modi Address: ‘स्त्री सर्व काही माफ करते, पण अपमान विसरत नाही…’; महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

PM Narendra Modi Address: महिला आरक्षण विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी अत्यंत भावूक आणि आक्रमक पवित्रा घेत देशातील माता-भगिनींची माफी मागितली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेत मंजूर होऊ शकले नाही, याचे मला मनापासून दुःख आहे. आम्ही शर्थीचे प्रयत्न करूनही विरोधकांनी अडथळा आणल्यामुळे यश मिळाले नाही. भारताच्या नारी शक्तीची भरारी रोखली गेली असून त्यांची स्वप्ने निर्दयपणे चिरडली गेली आहेत.”

विरोधकांचे कृत्य म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानावर घाला
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक यांसारख्या पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “एक स्त्री अनेक गोष्टी विसरू शकते, पण स्वतःचा झालेला अपमान ती कधीच विसरत नाही. संसदेत जेव्हा महिलांचे हक्क हिरावून घेतले जात होते, तेव्हा हे घराणेशाहीवर आधारित पक्ष बाकांवर थापा मारून जल्लोष करत होते. हा जल्लोष केवळ राजकीय नव्हता, तर तो देशातील प्रत्येक महिलेच्या प्रतिष्ठेवर आणि आत्मसन्मानावर केलेला थेट हल्ला होता.”

स्वार्थी राजकारणामुळे राष्ट्रहिताचे नुकसान
विरोधकांच्या राजकारणावर निशाणा साधताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, जेव्हा एखाद्या पक्षासाठी राष्ट्रहितापेक्षा ‘पक्षहित’ मोठे होते, तेव्हा त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागते. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेल्या या स्वार्थी राजकारणाचा फटका आज देशातील महिलांना बसला आहे. “21 व्या शतकातील भारतीय स्त्री प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तिला सत्याची पूर्ण जाणीव असून ती योग्य वेळी याचा जाब विचारेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा – Iran Attacks Indian Ships: होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर इराणी नौदलाचा गोळीबार; भारताने इराणी राजदूताला बोलावून नोंदवला तीव्र निषेध

विरोधकांना या ‘पापा’ची शिक्षा भोगावी लागेल
महिला आरक्षण ही काळाची गरज असून आमच्या प्रामाणिक प्रयत्नांचा विरोध करून विरोधकांनी एक प्रकारे ‘गर्भपात’च केला आहे, अशा तीव्र शब्दांत पंतप्रधानांनी आपली नाराजी व्यक्त केली. “काँग्रेस, सपा आणि तृणमूल काँग्रेसने महिलांच्या विरोधात गुन्हेगारासारखी भूमिका घेतली आहे. या विधेयकामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील राज्यांना बळ मिळाले असते, पण ते रोखणाऱ्यांना जनता नक्कीच शिक्षा देईल,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number