Shirur: ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालताना बैल उधळले अन्… , शिरुरमधील दुर्घटना

शिरुरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलांनी लोकांना तुडवलं आहे.

Shirur: ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालताना बैल उधळले अन्… , शिरुरमधील दुर्घटना

 

पुणे: शिरुरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलांनी लोकांना तुडवलं आहे. दोन चिमुकले या घटनेत जखमी झाले आहेत. ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालताना बैल उधळले आणि धक्कादायक प्रकार घडला. शिरुरच्या पिंपळे जगताप गावातील हा प्रकार आहे. भाद्रपद पोळ्यानिमित्त ग्रामदैवतेला प्रदक्षिणा घालताना बैल उधळले. डिजेच्या मिरवणूका सुरु होत्या आणि यावेळी बैल उधळले आणि ही दुर्घटना घडली. 

बैल पोळ्याच्या मिरवणुकीत मोठ्यानं गाणी वाजत असताना अचानक बैल उधळले. बैल उधळल्याने ते हातातून निसटले आणि बेफान होऊन उड्या मारत धावू लागले. दिसेल ते तुडवत है बैल पळत होते. गाडी, मुलं कोणीही पाहिलं नाही. दरम्यान, उधळलेल्या या बैलांचा मिरवणुकीत उपस्थित असलेल्या इतरांना कोणताही इजा झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number