Ahilyanagar Crime : विद्यार्थ्याचा गळा दाबला, 20 सेकंद हवेत उचलून धरलं, हाताचा चावा घेतला; मुख्याध्यापकाच्या क्रूर कृत्यानं अहिल्यानगर हादरलं! पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकाने शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्गातील मुलांचे भांडण मिटवण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांनी विद्यार्थ्याचा गळा दाबून 20 सेकंद हवेत उचलून धरले आणि हाताचा चावा घेतला. घरी गेल्यावर हा प्रकार समोर आल्याने पालकांनी बालकावर वैद्यकीय उपचार केले. तर […]

Ahilyanagar Crime : विद्यार्थ्याचा गळा दाबला, 20 सेकंद हवेत उचलून धरलं, हाताचा चावा घेतला; मुख्याध्यापकाच्या क्रूर कृत्यानं अहिल्यानगर हादरलं! पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकाने शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्गातील मुलांचे भांडण मिटवण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांनी विद्यार्थ्याचा गळा दाबून 20 सेकंद हवेत उचलून धरले आणि हाताचा चावा घेतला. घरी गेल्यावर हा प्रकार समोर आल्याने पालकांनी बालकावर वैद्यकीय उपचार केले. तर संबंधित मुख्याध्यापकाने फोनवरून चुकीची कबुली देत माफी मागितली असली तरी या गंभीर कृत्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी मुख्याध्यापकावर कडक कारवाई करण्याची मागणी पालक सोनल शेळके यांनी केली असून या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर शाळा व्यवस्थापनाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या संदर्भातील माहिती पीडित मुलाचे पालक सोनल शेळके आणि नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली. 

हेही वाचा : Pune : पुण्यात संतापजनक प्रकार! शाळकरी मुलांकडून चक्क भाजप नगरसेविकेचे पाय धुतले; घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number