Palghar Crime: रक्षकचं बनला भक्षक! तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर पोलीस हवालदाराकडून लैंगिक अत्याचार

घटनेची माहिती समोर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

Palghar Crime: रक्षकचं बनला भक्षक! तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर पोलीस हवालदाराकडून लैंगिक अत्याचार

पालघर प्रतिनिधी, विनायक पवार: पालघर जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. कासा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलेल्या महिलेवर हवालदाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेला तिच्या कौटुंबिक वादाच्या तक्रारीसंदर्भात चौकशीसाठी कासा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, चौकशीच्या नावाखाली आरोपी हवालदार शरद बोगाडे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत तिला पोलीस कॉलनीतील एका एकांत ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप पिडितेने केला आहे. 

हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल 

घटनेची माहिती समोर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपी हवालदाराविरुद्ध लैंगिक अत्याचार, धमकी आणि पदाचा गैरवापर या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Thane Crime: ठाण्यात फॅमिली कोर्ट परिसरातील कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी पीडितेला केकमधून दिलं गुंगीचे औषध

तपास आणि कारवाई

सदर प्रकरणाचा पुढील तपास आता कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला असून आरोपी हवालदाराला पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हेही वाचा – Kanpur Crime News: कानपूर हदरले! 20 लाखांच्या लालसेने घेतला मैत्रीचा जीव

हवालदाराविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई

दरम्यान, पालघर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बदली करण्याचे आदेश दिले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी हवालदाराविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच, पुढील चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number