S.T Bus Stand Free Toilets: प्रवाशांना सुखद धक्का! ST स्थानकांवरील स्वच्छतागृहे आता मोफत; ‘या’ तारखेपासून लागू होणार महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय

राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आगारांमधील सर्व स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

S.T Bus Stand Free Toilets: प्रवाशांना सुखद धक्का! ST स्थानकांवरील स्वच्छतागृहे आता मोफत; ‘या’ तारखेपासून लागू होणार महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय

S.T Bus Stand Free Toilets : एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. बस स्थानकांवरील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या वापरासाठी मोजावे लागणारे जास्तीचे पैसे या कटकटीतून आता प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आगारांमधील सर्व स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 1 जून 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर केली जाणार आहे.

अधिभारातून सुविधांचा दर्जा सुधारणार
एसटीने 15 एप्रिलपासून प्रत्येक तिकिटावर 2 रुपये 'स्वच्छता अधिभार' लागू केला आहे. यातून जमा होणारा निधी आता थेट प्रवाशांच्या सोयीसाठी वापरला जाणार आहे. सध्या अनेक ठिकाणी 5 ते 10 रुपये देऊनही स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात; मात्र आता महामंडळाने ही सेवा मोफत करून स्वच्छतेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. या निर्णयानुसार स्थानक आणि आगारांची दर 4 तासांनी यांत्रिक पद्धतीने साफसफाई केली जाणार आहे. तसेच, दुर्लक्षित असलेल्या पाणपोई पुन्हा सुरू करून प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल आणि चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात गरम पाण्याची सुविधा दिली जाणार आहे.

संस्थांशी कायदेशीर लढाईची तयारी
एसटीच्या एकूण 564 स्वच्छतागृहांपैकी 267 महामंडळाच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित 'सुलभ' आणि 'वाल्मिकी' सारख्या संस्थांकडे आहेत. महामंडळाने या संस्थांना नोटिसा बजावल्या असून सर्व स्वच्छतागृहे मोफत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयाविरोधात संबंधित संस्था न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महामंडळाने आधीच 'कॅव्हेट' दाखल करण्याची तयारी केली आहे, जेणेकरून प्रवाशांच्या हिताचा हा निर्णय रखडणार नाही.

हेही वाचा – ST Bus Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागला; 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह आता प्रवाशांवर 'या' कराचाही बोजा

तिजोरीवर पडणार आर्थिक भार
एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 55 लाख प्रवाशांपैकी ज्यांना सवलत नाही, त्यांच्याकडून 'स्वच्छता अधिभार' घेतला जातो. यातून महामंडळाला दरमहा सुमारे 30 कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. मात्र, स्वच्छतागृहे, स्थानक सफाई आणि गाड्यांची धुलाई यावर दरमहा 38 ते 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अधिभारातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा येणारी तूट महामंडळ स्वतःच्या तिजोरीतून सोसणार आहे, जेणेकरून प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number