Latur Pattern NEET Result : लातूरकरांची ऐतिहासिक भरारी; एकट्या शाहू कॉलेजचे 450 तर जिल्ह्यातून 1200 हून अधिक विद्यार्थी बनणार डॉक्टर

लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रातील 'लातूर पॅटर्न' हा कोणत्याही चुकीच्या मार्गावर नव्हे, तर केवळ कठोर परिश्रमावर आधारित असल्याचा संदेश संपूर्ण देशाला दिला आहे.

Latur Pattern NEET Result : लातूरकरांची ऐतिहासिक भरारी; एकट्या शाहू कॉलेजचे 450 तर जिल्ह्यातून 1200 हून अधिक विद्यार्थी बनणार डॉक्टर

Latur Pattern NEET Result : राष्ट्रीय पातळीवरील 'नीट' (NEET) प्रवेश परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या वादळानंतर लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, जाहीर झालेल्या निकालांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रातील 'लातूर पॅटर्न' हा कोणत्याही चुकीच्या मार्गावर नव्हे, तर केवळ कठोर परिश्रमावर आधारित असल्याचा संदेश संपूर्ण देशाला दिला आहे. या निकालामुळे लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेला लागलेला डाग पूर्णपणे पुसला गेला आहे.

एकट्या शाहू कॉलेजमधून 450 तर जिल्ह्यातून शेकडो मुले घेणार वैद्यकीय शिक्षण
लातूरमधील प्रसिद्ध राजर्षी शाहू महाविद्यालयातून सुमारे 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट शासकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस (MBBS) साठी प्रवेश मिळण्याची खात्री झाली आहे. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतल्यास, लातूरमधील विविध शिक्षण संस्थांमधून 1200 ते 1500 हून अधिक विद्यार्थी यंदा सरकारी वैद्यकीय जागांवर ताबा मिळवतील असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त खाजगी वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असणार आहे.

शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी
राजर्षी शाहू महाविद्यालयातून यंदा जवळपास 1400 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. प्राथमिक स्तरावर केवळ 600 विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करण्यात आले, ज्यामध्ये तब्बल 46 हून अधिक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुणांची कमाई केली आहे. उर्वरित 800 विद्यार्थ्यांच्या निकालाची तपासणी अजून सुरू असून, अंतिम आकडा याहून मोठा असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 530 गुणांचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा – Mumbai Local News : धक्कादायक! लोकलमध्ये एक व्यक्ती नशा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लातूरमधील नामांकित शिक्षण संस्थांचा दबदबा कायम
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील यशाची ही परंपरा केवळ एका संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नाही. लातूरमधील दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय या सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या नीट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या सामूहिक यशामुळे लातूरचे देशातील 'एज्युकेशन हब' म्हणून असलेले स्थान अधिक घट्ट झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number